कोकण

नाटक

CD

-rat११p१२.jpg-
२६O२३८०९
रत्नागिरी ः नवहिंद बालमित्र मंडळ, मुंबई या संस्थेने सादर केलेल्या ‘द हिंदू लेडी’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)

राज्य नाट्यस्पर्धा--लोगो

ब्रिटिश राजवटीतील कथा ‘द हिंदू लेडी’ रंगतदार
नवहिंद बालमित्र मंडळाचा प्रयत्न; रसिकांच्या मनावर ठसा
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः ब्रिटिश राजवटीच्या काळात समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी पुरोगामी विचारांच्या मंडळींनी ‘प्रार्थना समाज’ संस्थेची स्थापना करून बालविवाहाला विरोध, विवाहाचे वय वाढवणे, स्त्रियांना स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य मिळावे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता अशा मागण्या केल्या. या मागण्यांवर भाष्य करणारे नाटक ‘द हिंदू लेडी’ राज्य नाट्यस्पर्धेत नवहिंद बालमित्र मंडळाने (मुंबई) सादर केले. लेखक चेतक घेगडमल यांची संहिता महिला दिग्दर्शक शिवानी पेडणेकर यांच्या संकल्पनेतून रंगले. समाजसेविका डॉ. रखमा सावे यांचा जीवनप्रवास कलाकारांच्या अभिनयाने उलगडताना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
-----
ब्रिटिश राजवटीच्या काळात घडणारी ‘रखमा’ ही कथा रंगमंचावर कोर्टरूममधील प्रसंगाने सुरू होते. रखमा पतीपासून विभक्त होण्याची इच्छा न्यायालयासमोर मांडते आणि त्यातून तिचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडतो. समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या प्रार्थना समाजाचे कार्य, स्त्रीशिक्षण आणि स्वातंत्र्याचा लढा या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. विधवा जयंतीबाईंची मुलगी रखमाचा बालविवाह दादाजीशी होतो; मात्र दादाजीचा मामा नारायण रखमाशी गैरवर्तन करतो. त्यामुळे रखमा सासरी जाण्यास नकार देते. न्यायालयात वाद पोहोचतो. खालच्या न्यायालयातून घटस्फोट मिळाला तरी हायकोर्टाचा निकाल तिच्या विरोधात लागतो. तरीही रखमा शिक्षेला तयार असते; पण अन्यायकारक जीवन स्वीकारण्यास नकार देते. अखेर राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहिते तसेच ‘हिंदू लेडी’ या टोपणनावाने समाजप्रबोधन करणारी लेखिका ही रखमाच असल्याचे समजताच राणी तिची शिक्षा रद्द करते आणि तिला इंग्लंडमध्ये वैद्यकीय उच्चशिक्षणासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देते. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून डॉ. रखमा मुंबईत परतते. प्लेगच्या साथीच्या काळात ती हजारो रुग्णांची जीवाची पर्वा न करता सेवाशुश्रूषा करते. तिच्या कार्याची दखल घेऊन राणी व्हिक्टोरिया यांच्याकडून तिचा सत्कार करण्यात येतो. स्त्रीला घराबाहेर पडण्याचे आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या काळात प्रतिगामी परंपरांविरुद्ध उभी राहून स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या डॉ. रखमाच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवते.
---
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखकः प्रा. चेतक घेगडमल, दिग्दर्शक ः शिवानी पेडणेकर, संगीत ः दिनेश धुरी, नेपथ्य ः देवदत्त राऊत, नेपथ्य निर्माण ः उल्हास सुर्वे आणि मंडळी, प्रकाशयोजना ः सुनील मेस्त्री, वेशभूषा ः अनुप -विनित, वंदना. रंगभूषा ः शरद सावंत.
----
* पात्र परिचय
मोठी रखमा ः शिवानी पेडणेकर, छोटी रखमा ः कृपा शेटकर, जयंतीबाई ः इशिका शिशुपाल, डॉ. सखाराम राऊत ः विनित लाड, नारायण मामा ः अनुप येरूणकर, डॉ. पेचे ः रेवती केतकर, दादाजी ः ओंकार काकडे, दिघू ः प्रणव चव्हाण, पांडू ः योगेश मोरे, आत्मराम पांडुरंग ः अभिषेक शेटये, बेहरामजी मलबारी ः मृण्मय जाधव, चिन्नमा ः समिधा खामकर, शास्त्री ः ऋतुज करंदीकर, श्रीमंत ः अथर्व शिंदे, राणी व्हिक्टोरिया ः वंदना गानू, बिशप ः प्रसाद पेडणेकर, पेपरवाला ः अजय चिवलकर, कॉमनमॅन ः आदित्य शेंगाळ, इतर ः समीर मालणकर, नम्रता दळवी, राशी राणे, वेदिका पवार, सारांश तांबे, गौरव गगाडे, सक्षम साळुंखे.
-----------
* आजचे नाटक
नाटक ः वसुभूमी, सादरकर्ते ः फिनिक्स क्रीएशन, कोल्हापूर. वेळ सकाळी ११.३० वाजता. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT