कोकण

-बाप-मुलाच्या भावनिक संघर्षाची कथा ओय लेले

CD

राज्य नाट्यस्पर्धा--लोगो

-rat११p१०.jpg-
P२६O२३८०७
रत्नागिरी ः नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमीने सादर केलेल्या ‘ओय लेले’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---
बाप-मुलाच्या भावनिक संघर्षाची कथा ‘ओय लेले''
नवरस कलारंगचा यशस्वी प्रयत्न ; कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक रंगले
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः सध्याच्या ऑनलाईन जगात हरवत चाललेल्या बाप-मुलाच्या नात्याची ऑनलाईन मीडिया आणि सुविधांच्या आहारी जाणाऱ्या सध्याच्या पिढीवर भाष्य करणारे ‘ओय लेले’ नाटकाची संहिता दीपेश सावंत यांच्या लेखणीतून उतरली. राज्य नाट्यस्पर्धेत नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी बोईसर या संस्थेने या नाटकाचा प्रयोग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर केला. कलाकारांचा अभिनय आणि नेपथ्य, रंगभूषा, प्रकाशयोजना अशा चोहोबाजूने नाटक रंगतदार झाले. विनोदी ढंगाने जाणाऱ्या या नाटकाचे रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
-------
ऑनलाईन जगतात नातेसंबंधाची उणीव भासते. नवीन सुविधा, डिस्काउंट ऑफर यांच्या आहारी गेल्यामुळे जुने ते सोने म्हणण्याचा प्रकार उरला नाही. घरात जुन्या पिढीतील आजोबा-पणजोबांच्या काळातील वस्तू असेल तर तिच्यावरही संस्कार झालेले असतात. याचं सध्याच्या पिढीला काही देणेघेणे नसतं, अशी कथा दिग्दर्शक विशाल तांबे आणि दीपेश सावंत यांच्या संकल्पनेतून ‘ओय लेले’ या नाटकातून साकारण्यात आली.
निवृत्त बॅंक अधिकारी केशव लेले, पत्नी आशा, मुलगा श्रवण त्याची पत्नी मेधा असे कुटुंब. केशव यांचे जीवन पत्नी, मुलगा-सून यांच्याशी अगदी हसतखेळत विनोद करून जात असते; पण मुलाला घरातील जुन्या वस्तू विकून नवीन खरेदी करण्याचा छंद असतो. त्यामुळे वडील आणि मुलगा यांच्यातील वाद टोकाला जातात. वडील त्याला समजावतात; पण तो न समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो. नवीन प्रकारची, डिस्काउंट ऑफरमधील वस्तू खरेदी करतो. एके दिवशी घरातील जुने डायनिंग टेबल, रेडिओ ऑनलाईन विकून टाकतो. या वेळी मात्र वडिलांचा पारा चढतो. खडाजंगी होते. वडिलांना त्याचे मित्र नारायण समजावतात.
अखेर रात्रीच्यावेळी श्रवणचे आई-वडील रात्री श्रवणच्या लॅपटॉपवरून आई-वडील विकणे आहे, अशी जाहिरात करतात. त्यांना विकत घेण्यासाठी एका कंपनीचा एमडी पुंडलिक इनामदार घरी येतो. श्रवण आणि त्याची पत्नी मेधा आश्चर्यचकित होतात. पुंडलीक श्रवणच्या आई-वडिलांची किंमत पाच करोड करतो. पुन्हा श्रवणच्या मनात चक्रे सुरू होतात. पाच करोड मिळणार असतात. पुंडलिक डील फायनल असे सांगतो. दोन दिवसानंतर आई-वडिलांना नेण्यासाठी येणार, असे सांगून जातो. श्रवण-मेधा विचार करतात. श्रवण आई-वडिलांना अलिबागला जायचं आहे, असे समजावतो. त्या आधी आई-वडिलांनी जाण्याची तयारी करून ठेवलेली असते. पुंडलिक श्रवणच्या आई-वडिलांना नेण्यासाठी येतो. पुंडलिकला मी डील केली नसल्याचे सांगतो. तोवर आईच सांगते की ही डील आम्ही केली आहे. आई बॅग घेऊन पुंडलिकच्या गाडीकडे जाते. वडीलही श्रवणला पाच करोड मिळणार आहेत त्याचा आनंद घे, असे सांगून निघून जातात. घराबद्दलची, कौटुंबिक नात्यांची विचार करायला लावणारी ही कथा अंतर्मुख करते.
---------
* सूत्रधार आणि सहाय्य
लेखक ः दीपेश सावंत, दिग्दर्शक ः विशाल तांबे आणि दीपेश सावंत, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत ः विशाल तांबे, रंगभूषा ः उदयराज तांगडी, ध्वनीसंकेत ः वेदांत पावसकर, प्रकाश संकेत ः ध्रुव समानी.
----------
* पात्र परिचय
केशव लेले ः धनंजय कुलकर्णी, आशा लेले ः मंजूषा अमीन, श्रावण लेले ः प्रशांत गुरव, मेधा लेले ः मधाली गुरव, आकाश ः हर्ष म्हैसकर, पुंडलिक इमानदार ः परेश बागवे, नारायण ः दीपेश सावंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT