कोकण

भूमिअभिलेखचे १८ पासून काम बंद आंदोलन

CD

swt1110.jpg
23837
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देताना भूमिअभिलेखचे कर्मचारी.

भूमिअभिलेखचे १८ पासून
काम बंद आंदोलन
प्रलंबित प्रश्न ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः भूमिअभिलेख विभागातील महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मार्गी लागत नसल्याने, आता कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत १८ तारखेपासून राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिअभिलेखचे कर्मचारी सहभागी होणार असून याबाबतचे निवेदन समितीच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे व भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक सुजितकुमार जाधोरे यांना दिले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भूमिअभिलेख कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी खाते प्रमुख आणि महाराष्ट्र शासनाकडे आपल्या मागण्या मांडत आहेत. जमाबंदी आयुक्त, भूमिअभिलेख (पुणे) यांच्यासोबत अनेक बैठका होऊनही आणि वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे सर्व विभागांतील पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे एकत्र येऊन एका झेंड्याखाली येत कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जमाबंदी आयुक्त (पुणे) आणि इतर संबंधित विभागांना ३ फेब्रुवारीला आंदोलनाची रीतसर नोटीस बजावली आहे.
​या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्हा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरसू रेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा अधीक्षक (भूमिअभिलेख) सुजितकुमार जाधोर यांना माहितीसाठी निवेदनाची प्रत सादर केली. ​यावेळी कार्यकारिणी सदस्य एस. आर. पार्टे, एम. ए. सरमळकर, अय्याज शेख, अश्विनी गावडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास १८ तारखेपासून जिल्ह्यातील कामकाज पूर्णपणे बंद राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Belagum Fisheries : बेळगावात जलाशयांतून बहरले ‘रूपेरी पीक’; १२,३६० टन मत्स्य उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आधार!

No.1 E-sakal.com Marathi News : जबाबदार आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पावती; 5.6 कोटी युजर्ससह eSakalची ऐतिहासिक झेप

KDMT Bus: डोंबिवली-ठाणेकरांची लोकल गर्दीतून सुटका होणार, नव्या बससेवा सुरू करणार; कसा असेल मार्ग?

Sindhudurg ZP : दोडामार्गात मतदारांचा कौल बदलाचा; दिग्गजांना मावळतीचा सूर्य, नवख्या चेहऱ्यांचा राजकीय सूर्योदय!

SCROLL FOR NEXT