ब्राह्मणसभेतर्फे
दासनवमी पठण स्पर्धा
रत्नागिरी ः प्रतिवर्षाप्रमाणे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेतर्फे दासनवमी पठण स्पर्धा २८ फेब्रुवारीला सकाळी ९ वा. नाचणे येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कुवारबाव पंचक्रोशीतील सर्व शाळांचे विद्यार्थी आणि ब्राह्मणसभेच्या सभासदांच्या कुटुंबीयांचे पाल्य सहभाग घेऊ शकतात. जास्तीत जास्त पाल्यांना सहभाग घेण्यात प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेतर्फे करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त
‘आरंभ’ प्रदर्शन
रत्नागिरी ः महाशिवरात्रीच्या पावनपर्वानिमित्त रत्नागिरी शहरात धनश्री कलेक्शन ग्रुपतर्फे ‘आरंभ’ गृहोपयोगी वस्तूंचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवारपासून (ता. १४) व १५ फेब्रुवारीला सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत झाडगाव येथील श्री भैरव मंगल कार्यालयात होणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे कपडे, घरगुती व पारंपरिक खाद्यपदार्थ, मातीची भांडी, मसाले, गिफ्ट आर्टिकल्स तसेच दैनंदिन वापरातील आकर्षक गृहोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी दर्जेदार व वैविध्यपूर्ण वस्तू उपलब्ध होणार असल्याने नागरिकांसाठी ही एक उत्तम खरेदीची संधी ठरणार आहे. रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन उद्योजिका धनश्री धनंजय पालांडे व सहकाऱ्यांनी केले आहे.
संगमेश्वर परिसरातील
वीजपुरवठा उद्या बंद
संगमेश्वर ः संगमेश्वर येथील महामार्गावरील रोहित्राचे खांब उभे करणे, रोहित्र स्थलांतर करणे व बाजारपेठेला विद्युत्पुरवठा करणारी पर्यायी केबल बदलणे आदी कामांसाठी संगमेश्वरसह कोंडअसुर्डे परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (ता. १३) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. गुरूवार (ता. १२) बारावीची परीक्षा असल्याने व शुक्रवारी संगमेश्वर बाजारपेठ बंद असल्याने याचे नियोजन गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्यात आले आहे. काम लवकर झाल्यास विद्युत्पुरवठा वेळेआधी सुरू केला जाईल. हे काम हे पूर्वनियोजित असल्याने या कामाबद्दलची कल्पना ग्रामपंचायत संगमेश्वर यांना देण्यात आलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.