-rat११p१७.JPG-
२६O२३८१५
दापोली ः ओले काजूगर विक्रीसाठी बसलेल्या महिला.
-----
दापोलीत ओल्या काजूगरांना भाव
१४०० रुपये किलोचा दर; वाढत्या मागणीने बागायतदार खूष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता.११ : कोकणातील फळांचा हंगाम म्हणजे चवींचा उत्सवच. हापूस आंब्याला अजून अवधी असला तरी ओल्या काजूगरांचा दरवळ बाजारपेठेत पसरू लागला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हा मेवा काहीसा उशिराने दाखल झाला असला, तरी खवय्यांचा उत्साह कमी झालेला नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच किमतींनी ‘तिखट’ चव दिल्याने ग्राहकांना खिसा सैल करावा लागत आहे. सध्या दापोली बाजारात ओल्या काजूगरांचे दर प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ विक्रीत काही ठिकाणी १० रुपयांना ३ बिया अशा दराने विक्री सुरू आहे.
यंदा अवकाळी पाऊस व दाट धुके यामुळे सुरुवातीचा मोहोर काळवंडल्याने बागायतदार चिंतेत होते; मात्र, वेळेवर फवारणी आणि योग्य निगा राखल्याने बागा सावरल्या. सध्या काजूच्या बियांनी झाडे बहरलेली दिसत असून, कैऱ्यांची आवकही हळूहळू सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यावरच हा मेवा बाजारात उपलब्ध झाला आहे. कोकणात पर्यटनासाठी आलेले पर्यटक ओल्या काजूगरांची खरेदी करताना दिसत आहेत. कोकणातील हापूस आणि काजू यांची मागणी स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून जिल्ह्याबाहेरही मोठ्या प्रमाणात आवक जावक सुरू आहे. चढ्या दरानंतरही ओल्या काजूगराची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
----
कोट
सुरुवातीला पावसामुळे नुकसान होईल असे वाटले होते; पण योग्य निगा राखल्याने आता उत्पादन हाती येत आहे. उशिरा का होईना बाजारात मागणी चांगली असल्याने दिलासा मिळत आहे.
--बिपिन मयेकर, काजू बागायतदार, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.