कोकण

सुनीता कासार सर्वाधिक तर अजय चाळके १४ मतांनी विजयी

CD

सुनीता कासार सर्वाधिक मतांनी विजयी
पंचायत समितीत; खेड तालुक्यात शिंदेसेनेला १० जागा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : तालुक्यात पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत सुकीवली गणातील शिंदेसेनेच्या उमेदवार सुनीता कासार या सर्वाधिक २ हजार २५७ मताधिक्याने विजयी झाल्या तर उद्धव सेनेचे लोटे गणातील तरुण उमेदवार अजय चाळके हे अवघ्या १४ मतांनी पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य बनले आहेत. पंचायत समितीच्या एकूण १४ जागांपैकी १० जागा शिंदेसेनेने, ३ जागा उद्धवसेनेने तर एकमेव जामगे गणांत राष्ट्रवादीने (अजित पवार) विजय मिळवला आहे.
तालुक्यातील लोटे, आंबडस, आंजणी, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी व धामणदिवी हे सात गण गुहागर विधानसभा मतदार संघात असून, उर्वरित सुकीवली, जामगे, भडगाव, भरणे, खवटी, दयाळ व तिसंगी हे गण दापोली विधानसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. तिसंगी गणातून शिंदेसेनेच्या महेंद्र भोसले यांनी तब्बल १९२७ मते घेऊन तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्यमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला आहे. भरणे गणात शिंदेसेनेचे ३२ वर्षीय तरुण उमेदवार प्रशांत चव्हाण यांनी तालुक्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची १८९८ मते घेऊन विजय मिळवला आहे. आंबडस गणात उद्धवसेनेच्या अमिता बने यांनी अवघ्या ४४ मतांनी विजय मिळवून पंचायत समितीच्या राजकारणात प्रवेश केला आहे. एकूण १४ पंचायत समिती गणातील ६ गणातील विजयी उमेदवारांनी तब्बल १ हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे. धामणदिवी गणांत उद्धवसेनेच्या रेवती घाग यांनी १५९ मतांनी विजय मिळवला. वीराचीवाडी गणात शिंदेसेनेचे दिलीप डेरवणकर यांनी १०८९ मतांनी तर गुणदे गणात ११८० मते घेऊन सुनील मोरे यांनी पंचायत समितीत पुन्हा प्रवेश केला आहे. भडगाव गणातील शिंदेसेनेचे संग्राम कदम यांनी १४०८ तर खवटीमधून नम्रता तांबट यांनी १२३८ मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी (अजित पवार) कडून अपूर्वा जाधव यांनी जामगे गणातून ८६५ मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत ३०० पेक्षा कमी फरकाने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये दयाळ गणाच्या शमिका म्हादे (२३७ मते) व आंजणी गणातील आफिया पालेकर या शिंदेसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT