कोकण

संक्षिप्त-सावंतवाडी येथे योगोपचार शिबिर

CD

सावंतवाडी येथे
योगोपचार शिबिर
ओटवणेः येथील पतंजली योग समिती आणि वैश्य समाज यांच्यावतीने सावंतवाडीत १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान निःशुल्क पाच दिवशीय संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. सावंतवाडी पतंजली योग समितीच्या स्थायी योग वर्गाला १८ फेब्रुवारीला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गवळी तिठा येथील वैश्य भवनात सकाळी ५.३० ते ७ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, अ‍ॅडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार, ताणतणाव मुक्तता, पचनक्रिया तसेच वजन नियंत्रण, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात पंचकर्म, षटकर्म व मोहन चिकित्सा योगमुद्रा आणि आयुर्वेद याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी सावंतवाडी पतंजली योग समितीचे समन्वयक विकास गोवेकर, दत्तात्रय निखार्गे यांच्याशी संपर्क साधावा.
.......................
न्हावेलीत बुधवारी
‘शुक्रग्रहण’ नाटक
सावंतवाडीः न्हावेली-दळवीवाडी येथील बंड्या दळवी यांच्या घरी बुधवारी (ता. १८) रात्री ८.३० वाजता पार्सेकर नाट्यमंडळ, उभादांडा यांचा ट्रिकसीनयुक्त ''शुक्रग्रहण'' नाट्यप्रयोग होणार आहे. यात बाबा कामत, विलास तेंडोलकर, वैभव धुरी, सदाशिव मोडक, प्रवीण गावकर, गौतम केरकर, मनीष लाड, बाळू कोचरेकर, भरत नाईक, चारू तेंडोलकर, रामू शिंगाडे आदी कलाकार भूमिक साकारणार आहेत.
.........................
आंबा बागायतदारांची
वेंगुर्लेत आज बैठक
वेंगुर्ले ः कोकणात आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही प्रतिकूल नैसर्गिक आपत्तीमुळे फवारणी करूनही मोहोर जळून गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक संकटांत सापडला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार संघटनेतर्फे उद्या (ता. १३) सकाळी ११ वाजता वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात नुकसानग्रस्त आंबा-काजू उत्पादक शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आंबा व काजू बागायतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर व प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
........................
न्हिवेत आजपासून
धार्मिक कार्यक्रम
मालवणः न्हिवे श्री ब्राह्मण देवालय येथील श्री ब्राह्मणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १४) साजरा होणार आहे. यानिमित्त तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. १३) सकाळी ७.३० ते १.३० या वेळेत नवचंडी याग, रात्री ९ वाजता गवळदेव समई नृत्य, बोर्डवे यांचा समईनृत्य कार्यक्रम, शनिवारी (ता. १४) सकाळी ७.३० वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता आरती, १.३० ते ३ महाप्रसाद, दुपारी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने, रात्री ९ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, ९.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार तसेच नाट्यमंडळ चेंदवण यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘व्यंकटरमणा जय गोविंदा’ (महिमा तिरुपती बालाजीचा), रविवारी (ता. १५) रात्री ९ वाजता स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
.........................
वेंगर्ले वाचनालयास
२५ हजारांची देणगी
वेंगुर्लेः तालुक्यातील निवृत्त शिक्षिका रत्नप्रभा प्रभूसाळगावकर यांनी येथील नगरवाचनालय संस्थेला २५ हजारांची देणगी दिली आहे. या देणगीतून २०२७ पासून वेंगुर्ले तालुक्यामधून पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना नलिनी गणेश प्रभूसाळगावकर स्मृती पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रभूसाळगावकर यांनी दिलेल्या देणगीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी आभार मानले.
........................
मठ येथे आजपासून
महाशिवरात्र उत्सव
वेंगुर्ले ः मठ येथील स्वयंभू मंदिरात १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. उद्या (ता. १३) सकाळी लघुरुद्र, अभिषेक, परिवार देवतांवर अभिषेक, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, भजन व रात्री ८ वाजता भाऊ नाईक यांचे कीर्तन, शनिवारी (ता. १४) सकाळी लघुरुद्र, अभिषेक, रुद्र स्वाहाकार, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव व रात्री ८ वाजता भाऊ नाईक यांचे कीर्तन, रविवारी (ता. १५) सकाळी लघुरुद्र, अभिषेक, नामस्मरण, श्री वरदशंकर महापूजा, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता भाऊ नाईक यांचे कीर्तन, रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा, ११.३० वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, सोमवारी (ता. १६) सकाळी ९ वाजता उत्सवाची सांगता, दुपारी महाप्रसाद होणार आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT