कोकण

कौशल्य विकासातून अर्थार्जनाची संधी

CD

24314

कौशल्य विकासातून अर्थार्जनाची संधी

डॉ. योगेश पिसोळकर ः सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘हेरिटेज टूर गाईड’

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले हुशार आहेत; मात्र त्यांनी स्वतःचे हित ओळखून योग्य कौशल्ये आत्मसात केल्यास ते सन्मानाने उत्तम अर्थार्जन करू शकतात. हा कोर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपली प्रगती साधण्याची एक मोठी संधी आहे, असे प्रतिपादन डॉ. योगेश पिसोळकर यांनी सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे केले.
स्थानिक वारसा आणि पर्यटनाची सांगड घालून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्‍घाटन सोहळा उत्साहात झाला. जिल्ह्यातील ऐतिहासिक वैभवाचे जतन आणि पर्यटनाला व्यावसायिक जोड देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगेश पिसोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संचालक डॉ. शशिकांत झांट्ये, डॉ. आर. एन. काटकर, प्रायोजक विद्याधर केनवडेकर आणि प्रभारी प्राचार्य कैलास राबते उपस्थित होते.
प्रा. राबते यांनी आपल्या मनोगतात पर्यटन क्षेत्रातील वाढती मागणी आणि या अभ्यासक्रमामुळे निर्माण होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या संधींवर प्रकाश टाकला. डॉ. झांट्ये यांनीही स्थानिक वारशाचे संवर्धन करून युवकांनी या क्षेत्रात कसे नाव कमवावे, याबद्दल मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशिक्षित गाईड तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर कुशे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Encounter: पहाटे ३.३० वाजता सुरू झाला गोळीबार… एसपींच्या गाडीवरही फायरिंग! कुख्यात अमजदचा अखेर अंत

Satara News: फलटणमध्ये हनीट्रॅप! हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मागितले ४० लाख; नेमकं काय घडलं?

Mahashivratri: देवही खेळतात फासे! ओंकारेश्वर मंदिराचे 'हे' गुपित ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; महाशिवरात्रीला उघडतं अनोखं रूप

Maha shivratri: काशीत चमत्कार! बाबा विश्वनाथ चक्क आसामी कपड्यांत नटणार; ११ प्रकारच्या लाकडांनी बनवलेल्या सिंहासनावर होणार विराजमान

Premium|India vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामना: कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर आज रंगणार

SCROLL FOR NEXT