कोकण

टंचाई आराखड्यात १७ गावे, ४१ वाड्यांचा समावेश

CD

-rat१२p१५.jpg-
26O24055
राजापूर ः टंचाईमुक्त तालुका होण्यासाठी श्रमदानातून बांधलेले बंधारे उपयुक्त ठरणार आहेत.
-----
टंचाई आराखड्यात १७ गावे, ४१ वाड्या
राजापूर तालुका; निवारण्यासाठी १ कोटी १३ लाखांचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ : राजापूर पंचायत समितीने तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. १७ गावे, ४१ वाड्यांचा समावेश असलेल्या १ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचा हा आराखडा आहे. यामध्ये टँकरग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणीपुरवठा योजना दुरूस्ती, विहिरीत गाळ उपसा वा दुरूस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे करून टँकरमुक्त गावे करण्यावर भर देण्यात आला आहे.
पाणीटंचाई आराखड्यामध्ये विहीर खोदण्याची १४ लाख ४० हजार रुपयांची १२ कामे, विंधन विहीर दुरुस्तीची १९ लाख रुपयांची आठ कामे, नळ पाणीपुरवठा दुरुस्तीची २१ लाख रुपयांची तीन कामे, विहीर गाळ व दुरुस्तीची ४४ लाख रुपयांची तेरा कामे, १५ लाख रुपयांची १ तात्पुरती पूरक नळपाणी योजना या कामांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करताना टंचाईग्रस्त गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी गावाची, वाडीची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे.
------
चौकट
आराखड्यात यांचा समावेश
या आराखड्यामध्ये देवीहसोळ-लिगमवाडी, सोलगाव-बंडबेवाडी, झर्ये-धनगरवाडी, बौद्धवाडी, कदमवाडी, सुतारवाडी, गुरववाडी, शीळ-भंडारवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ-सम्राट अशोकनगर बौद्धवाडी रस्तावाडी, तांबळवाडी मधली शिवगणवाडी, मधली उपळकरवाडी खालचीवाडी, चुनाकोळवण-धनगरवाडी, सोनारवाडी, गोठणेदोनिवडे-बौद्धवाडी, भालावली-खालचा भंडारवाडी, जोशीवाडी, कोंडीवळे-कासारवाडी, कासारवाडी स्मशानभूमी येथे, कातळवाडी, गोतावडेवाडी, येळवण-आयरेवाडी, लाडवाडी, मोरोशी-चर्मकारवाडी, मिरासवाडी, दोनिवडे-धनगरवाडी, कातळवाडी, ओणी-तोरणभाटी, वडवली-मांडवकरवाडी, चौरेवाडी, खालचीवाडी, बौद्धवाडी, शिवाजीनगर, तेलीवाडी, खिणगिणी-बौद्धवाडी, कदमवाडी, डोंगरकरवाडी, वालमवाडी, राऊतवाडी, हर्डीकरवठार, धोपेश्‍वर-चापडेवाडी, गिरमादेवी कोंड, पन्हळेतर्फ राजापूर चौरेवाडी, बारसू वरची बारसूवाडी येथील कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT