कोकण

नादुरुस्त खेळण्यांमुळे सावंतवाडीत धोका

CD

swt129.jpg
24085
सावंतवाडी ः येथील शिव उद्यानमधील खेळण्यांची पाहणी करताना देव्या सूर्याजी.

नादुरुस्त खेळण्यांमुळे
सावंतवाडीत धोका
देव्या सूर्याजी : नगरपरिषदेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ : येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानमधील खेळणी धोकादायक बनली आहेत. घसरगुंड्या नादुरुस्त होत चालल्या असून नगरपरिषदेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केला आहे.
घसरगुंडीच्या फायबरला तडे गेले आहेत. त्यामुळे लहान मुलांना इजा होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेने यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. या ठिकाणी नवीन घसरगुंड्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी सूर्याजी यांनी केली. तसेच ओपन जीममधील व्यायामाचे साहित्य खराब झाले आहे. येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व युवकांना मोडकळीस आलेल्या साहित्याचा वापर करावा लागत आहे. एक महिन्यापूर्वी लेखी पत्र नागरिकांनी देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. योजनेतून आलेल्या साहित्याची देखभाल, राखण हे नगरपरिषद प्रशासनाचे काम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य मोडकळीस व नादुरुस्त असलेली खेळणी व व्यायामाचे साहित्य नवीन बसवण्याची कार्यवाही करावी, असे श्री. सूर्याजी यांनी सांगितले. उद्यानातील खेळणी व त्यापासून निर्माण झालेला लहान मुलांना धोका बघता तातडीने त्यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT