कोकण

कारिवडेतील पायवाटेसाठी उपोषण

CD

२४०९३

कारिवडेतील पायवाटेसाठी उपोषण
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : चर्मकार वस्तीवरील मार्ग
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः कारिवडे (ता. सावंतवाडी) येथील चर्मकार वस्तीवरील पारंपरिक पायवाट खुली करून मिळावी, या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली वडिलोपार्जित पायवाट तातडीने खुली करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित पायवाट पूर्वीपासून अस्तित्वात होती; मात्र एका व्यक्तीने या वाटेवरून ये-जा करण्यास मनाई केल्याने वस्तीवरील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत कारिवडे, तहसीलदार सावंतवाडी तसेच पोलिस निरीक्षक यांच्याकडे वारंवार मांडण्यात आली होती. प्रत्यक्ष भेट घेऊन, चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या पाणंद व सार्वजनिक रस्ते खुले करण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, माडखोल येथील मंडल अधिकाऱ्यांनी सादर केलेला पाहणी अहवाल ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. पाहणीदरम्यान पंच यादी न घालणे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलिसपाटील यांना न बोलावणे या गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत पुनर्पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व पायवाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
पायवाट बंद असल्याने शाळकरी मुले, आजारी व दिव्यांग, वयोवृद्ध नागरिक तसेच गर्भवती महिलांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री-अपरात्री रुग्णांना दवाखान्यात नेणे कठीण होते. तसेच एखाद्या व्यक्तीचा गावाबाहेर मृत्यू झाल्यास पार्थिव गावात आणणेही अवघड होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. पारंपरिक पायवाट तातडीने खुली करून न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT