कोकण

-बचत गट चळवळीतून महिला सक्षम

CD

-rat१२p१६.jpg-
२६O२४०६३
रत्नागिरी : रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या माता रमाई बचत गटातील पदाधिकारी, सदस्य.
-----
‘माता रमाई बचतगटा’चा रौप्य महोत्सव
२५ वर्षांचा यशस्वी प्रवास; महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : महिला बचतगटांची संकल्पना राज्यात २००१ मध्ये मूळ धरू लागली. त्या वेळी अंजली कदम आणि विद्या राजहंस यांच्या संकल्पनेतून माता रमाई बचत गटाची स्थापना झाली. बचत, एकमेकींच्या गरजेच्या वेळी आर्थिक मदत, काही काळ अंगणवाडीसाठी पोषण आहार शिजवून दिले. महिला गृहोद्योग, कुरिअर सेवा अशा छोट्या छोट्या उद्योगांतून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
खेडशीमध्ये या गटाचा नुकताच रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात गटाच्या सभासद असलेल्या महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी विविध प्रकारचे कलाविष्कार सादर केले. बचत गटाच्या अध्यक्षा आणि सचिवांच्या सर्वांच्यावतीने सत्कार करण्यात आला. फनी गेम्स घेण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. रोहिणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या गटामध्ये चरवेली, कारवांचीवाडी, खेडशी, शिवाजीनगर, रत्नागिरी अशा १० वेगवेगळ्या ठिकाणांच्या महिलांचा समावेश आहे. गेल्या २५ वर्षांत गटातील महिलांनी पोषण आहार शिजवणे, गृहोद्योग, कुरिअर सेवा व अनेक प्रकारचे व्यवसाय केले. रौप्य महोत्सवी कार्यक्रमात यातील महिलांनी सांगितले की, ‘आमच्या बचत गटाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. हा बचत गट अध्यक्षा, सचिव यांनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळला व वाढवला आहे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद न होता एकमेकांना समजून घेत आणि या सगळ्याचा आनंद घेत सर्वजणी उत्साहाने आणि आनंदाने एकत्र नांदत आहेत.’
-----
गटाच्या सभासद महिला
अंजली कदम (अध्यक्षा), मंदा दीपंकर (सचिव), सीमा गायकवाड, वैशाली पवार, विद्या राजहंस, सौरभी पवार, मनीषा कांबळे, स्नेहा मोहिते, शुभांगी सावंत, आनंदी रोकडे, आकांक्षा जाधव, रोहिणी जाधव, अनुष्का सावंत, सोनिया सरतापे, विद्या धोत्रेकर, रंजना गायकवाड, प्रिया भोसले, शुभांगी तापेकर, अस्मिता करवंजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT