कोकण

सावंतवाडीत उपसभापती पदासाठी स्पर्धा

CD

सावंतवाडीत उपसभापती पदासाठी स्पर्धा

पंचायत समिती : नव्या चेहऱ्यांचे राज्य

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३: तालुक्यात पंचायत समितीवर नव्या चेहऱ्यांचे राज्य असणार आहे. यातच सभापतीपदी शिंदे शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची निवड निश्चित आहे; मात्र उपसभापतीपदी कोण असणार? याची उत्सुकता आहे.
सभापती होणाऱ्या जाधव या शिंदे शिवसेनेच्या असल्याने उपसभापतीपद हे युतीधर्मातून भाजपच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अनुभवी आणि जुना चेहरा म्हणून प्राजक्ता केळुस्कर यांच्यासह बिनविरोध निवडून आलेल्या महेश धुरी यांची नावे चर्चेत आहेत; मात्र वरिष्ठ पातळीवर नेमका कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येथील पंचायत समितीवर प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधीचे राज्य पाहायला मिळणार आहे. दीर्घकाळ येथील कारभार हा प्रशासकीय पातळीवरून हाकला जात होता. तालुक्याचा विचार करता नव्याने निवडून आलेल्या चेहऱ्यामध्ये केवळ कारिवडे पंचायत समितीच्या प्राजक्ता केळुसकर या एकमेव अनुभवी सदस्य यावेळी सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहेत. इतर नवीन चेहरे असले तरी यातील बऱ्याच जणांनी ग्रामपंचायत सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. यामध्ये उत्कर्षा गावकर, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये यांचा समावेश आहे. प्रणाली तिळवे व जितेंद्र गावकर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. एकूणच प्रशासनाचा अभ्यास आणि सुशिक्षित अशा चेहऱ्यांचा यावेळी पंचायत समिती सदस्याच्या यादीत भरणा असल्याने सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण विषय हाताळले जातील, अशी अपेक्षा आहे. यापलीकडे नव्याने आणि अपक्ष निवडून आलेल्या चेहऱ्यामध्ये सुशिक्षित चेहऱ्यांना जनतेने संधी दिली आहे. या सर्वांचा विचार करता उपसभापतीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? आणि त्या खुर्चीवर कोण बसणार? याची चर्चा आता रंगू लागली आहे.
-------
कोण आहेत दावेदार
आरक्षणानुसार तळवडेतून निवडून आलेल्या सुष्मिता जाधव सभापती होणार आहेत. अनुभवी सदस्य हा निकष लावल्यास उपसभापतीपदी प्राजक्ता केळुसकर यांचे नाव येऊ शकते. महेश धुरी, गौरव मुळीक, नेहा कांबळी, प्रशांत सुकी, धनश्री मराठे याही भाजप कोट्यातून दावेदार असणार आहेत. उपसभापती म्हणून पुरुष चेहरा दिला तर महेश धुरी यांना संधी मिळू शकते.
---
अपक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
पंचायत समितीत अपक्ष निवडून आलेल्या चेहऱ्यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. अपक्ष नेमकी कोणती भूमिका बजावणार? म्हणजेच विरोधी बाकावरच बसणार, की सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करणार? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व गणित येणाऱ्या काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी! म्हाडा ५००० घरांसाठी लॉटरी काढणार; पण कधी? तारीख आली समोर

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

Rahul Narvekar Video: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पळ का काढला? दादागिरी करुन शेत मोजणीचं काम? नार्वेकर म्हणतात...

Silver Loan Process : चांदी बँकेत गहाण ठेऊन किती लाखांपर्यंत कर्ज मिळतं? जाणून घ्या नवा नियम अन् तुमच्या फायद्याची गोष्ट

स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT