24310
कर्करोग समूळ उच्चाटनासाठी
मुळदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन
कुडाळ, ता. १३ : जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून फलोत्पादन महाविद्यालय मुळदे येथे आयुष आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाच्या वैद्य व योगशिक्षिका प्रियंका पाटील-पटाडे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कर्करोग टाळण्यासाठी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
यावेळी मुळदे फलोत्पादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय दळवी उपस्थित होते. महाविद्यालयीन युवा वर्गामध्ये कर्करोगाबाबत वेळीच जाणीव जागृती व्हावी तसेच कर्करोग होऊ नये म्हणून युवाईने कोणती काळजी घ्यावी, या अनुषंगाने जीवनशैली, आहार, विहार याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर तसेच सोशल माध्यमांकडे युवा वर्गाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा. विविध माध्यमातून निर्माण होणारे ताणतणाव, नैराश्य, भीती, वाईट व्यसने याबाबत युवाईने कोणती काळजी घ्यावी, या सगळ्याला कसे सामोरे जावे, आपले करिअर कसे विकसित करावे याबाबतही त्यांनी मानसशास्त्रीय चर्चा घडवून आणली. प्रा. डॉ. दळवी यांच्या हस्ते वैद्य पटाडे यांचा महाविद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. प्रा.डाॅ. संदीप गुरव यांनी आभार मानले. महाविद्यालयातील सुमारे ९७ विद्यार्थ्यांनी या विशेष व्याख्यानाचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.