सुभाष गोवेकर यांना
जीवनगौरव पुरस्कार
सावंतवाडी : केंद्राच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र आणि प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे सुभाष गोवेकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘समर्पित ज्येष्ठ’ या उपक्रमांतर्गत हा सोहळा झाला. ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात श्री. गोवेकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या निर्मळ स्वभावाचे आणि समाजसेवेचे कौतुक केले.
........................
असलदे येथे आज
धार्मिक कार्यक्रम
नांदगाव : असलदे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे उद्या (ता. १४) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त सकाळी १० ते १२ श्री सत्यनारायण महापूजा, १२ ते १ महाआरती, दुपारी १ ते ३ भाविकांना तीर्थप्रसाद व महाप्रसाद वाटप, ४ ते ६ महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी सातला स्थानिक भजने, रात्री नऊला श्री जय हनुमान पौराणिक नाट्य मंडळ -ओरोस दांडेली यांचा भक्तिप्रधान पौराणिक रहस्यमय नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज नगर, असलदे यांच्यावतीने केले आहे.
.....................
माजगाव येथे आज
‘इस्कॉन’तर्फे कीर्तन
सावंतवाडी ः जिल्हा परिषदचे सदस्य तथा भाजपचे युवा नेते विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी उद्या (ता. १४) ‘इस्कॉन’च्या माध्यमातून विशेष ‘हरे राम हरे कृष्ण’ कीर्तनाचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहाळा कीर्तनाला सुरुवात होईल. या भक्ती सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी आणि नामस्मरणाचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील सर्व भाविक आणि भक्त मंडळींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन ‘इस्कॉन’ मंदिर आणि सावंत परिवाराने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.