कोकण

शिवभक्तांचे आराध्य श्री देव कुणकोबा

CD

पुरवणी डोके ः श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रा विशेष
---

24482
श्री देव कुणकेश्‍वर मंदिर
24483
मंदिरातील पिंडी

शिवभक्तांचे आराध्य
श्री देव कुणकोबा

लीड
कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (ता. १५) यात्रा भरत आहे. यात्रेत भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळतो. यात्रोत्सवात रोषणाईने उजळून निघणारे मंदिर, भक्तांच्या उपस्थितीने गजबजणारा यात्रा परिसर, देवस्वाऱ्यांच्या आगमनावेळचे नेत्रदीपक दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांची धडपड असते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने...
- संतोष कुळकर्णी, देवगड
.......................................
कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि शिवाचे एक जागृत स्थान म्हणून ओळख असलेल्या देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील श्री देव कुणकोबा येथे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेची समुद्रस्नानाने मंगळवारी (ता. १७) सांगता होईल. यात्रेच्या निमित्ताने होणारी भाविकांची अलोट गर्दी, भेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्यांचे अलौकिक दृश्य भाविकांना अनुभवता येते. वाढत्या श्रद्धेमुळे भाविकांचे पाय आपोआपच कुणकेश्‍वरकडे वळतात. यात्रेबरोबरच श्रावण महिन्यात दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होते. अलीकडे कुणकेश्‍वर पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसते. सातत्याने धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने कुणकेश्‍वर क्षेत्र पर्यटकांनी गजबजलेले असते. यात्रेत तर भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळतो. यात्रोत्सवात रोषणाईने उजळून निघणारे मंदिर, भक्तांच्या उपस्थितीने गजबजणारा यात्रा परिसर, देवस्वाऱ्यांच्या आगमनावेळचे नेत्रदीपक दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांची धडपड असते. सातत्याने वाढणाऱ्या गर्दीमुळे भाविकांची कुणकेश्‍वरावरील श्रद्धा अधिकच दृढ बनत चालली आहे. मंदिराशेजारील अथांग पसरलेल्या अरबी समुद्राबरोबरच यात्रेतील भक्तांचा महासागर कुणकेश्‍वरावरील भक्तिमय प्रेमाची साक्ष द्विगुणित करताना दिसते. यात्रेवेळी मंदिरातील देव भेटीचा सोहळा अलौकिक असतो. यात्रेसाठी कुणकेश्‍वरला अखंडितपणे दर्शनासाठी येणारे भाविक आहेत. परिसरामधील गावातील मुंबईसह अन्य प्रमुख शहरात असलेली मंडळी यात्रेवेळी आपल्या मुळगावी येतात. त्यांच्यासाठी यात्रोत्सव एक पर्वणीच असते. कुणकेश्‍वरमधील शिवाच्या स्थानाची महती दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविक भक्तांची सातत्याने गर्दी वाढताना दिसते. मंदिर सभोवतालचा परिसर सुशोभित झाल्याने मंदिराच्या आकर्षकतेमध्ये अधिकच भर पडली आहे. मुख्य मंदिरालगत असलेली अन्य देवतांची मंदिरेही आता आकर्षक झाली आहेत. मंदिराच्या आवारात श्री देव गणपती, श्री देव भैरव, श्री देव मंडलिक, श्री देव नारायण, श्री जोगेश्‍वरी आदी देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांचेही सुशोभीकरण झाल्याने परिसराची शोभा अधिक वाढली आहे. मंदिर परिसरही आता आकर्षक भासत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार लक्षवेधी ठरत आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानकडून आवश्यक काळजी घेतली जाते. यात्रेवेळी मंदिरावर केली जाणारी विद्युत रोषणाई आणि रात्रीच्यावेळी त्याचे समुद्राच्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब अलौकिक भासते. त्यामुळे हा अनोखा नजराणा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची धडपड असते. भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवासासह स्वच्छतागृहाची स्वतंत्र सोय आहे. भक्तनिवासासमोर नव्याने बांधकाम करून सभागृहासह दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरात दर्शन रांग स्वतंत्र व्यवस्था केल्याने गर्दीचा त्रास होणार नाही. याच इमारतीमध्ये देवस्थानचे सुसज्ज कार्यालय आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून देवस्थान समिती प्रयत्नशील असते. यात्रेचे शिस्तबद्ध नियोजन हे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. समुद्रस्नानावेळी भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिनेही विशेष काळजी घेतली जाते. समुद्राच्या बाजूने मंदिरालगत रस्ता असल्याने भाविकांना फिरताना सोयीचे झाले आहे. मंदिराच्या आवारभिंतीही उंच करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या भाविक यात्रेकरूंसाठी अधिकाधिक सोयी कशा पुरवता येतील, यादृष्टीने देवस्थान सातत्याने विचाराधीन असते. कुणकेश्‍वर विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात.
......................
धार्मिक पर्यटनस्थळ
दिवाळी सणात कुणकेश्‍वर मंदिर दीपोत्सवाने उजळून निघते. हजारो पणत्या एकाचवेळी प्रज्वलित केल्या जातात. यावेळी फटाक्यांची होणारी आतषबाजी मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकते. श्री क्षेत्र कुणकेश्‍वरची धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख वाढत आहे. हजारो पर्यटक दरवर्षी कुणकेश्‍वरला भेट देतात. पर्यटकांबरोबरच शालेय सहलींमध्येही वाढ झाली आहे. खासगी वाहनांने येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढती आहे. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर भक्तांनी कायम गजबजलेले असते.
...............................
हापूस आंब्यांची आरास
श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरालगतच अथांग अरबी समुद्र पसरला असल्याने सौंदर्यात अधिक भर पडली आहे. एकाचवेळी धार्मिक पर्यटन आणि निसर्गाशी संवाद साधण्याची पर्यटकांना संधी मिळते. कुणकेश्‍वर मंदिरात हंगामात हापूस आंब्याची आरास करण्यात येते. आंब्यांनी मंदिराच्या आतील भाग सजवला जातो. मंदिराचा गाभारा हापूस आंब्यांनी भरून जातो. अलीकडे मंदिर परिसरात हिरकणी कक्ष तयार करण्यात आला असून तो यात्रेनंतरही कायम सुरू ठेवण्याचा देवस्थानचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT