कोकण

तीनबत्ती नाक्यातील रस्ते राज्य महामार्ग कामासाठी अडवले

CD

तीनबत्ती नाका बंद, वाहतूक विस्कळीत
पर्यायी मार्गावर ताण; खेड बाजारपेठेतील कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : भरणे ते दापोलीपर्यंतच्या राज्य महामार्ग कामातील भरणे ते अण्णाच्या पऱ्यानजीक राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. असे असतानाच शहरातील तीन बत्तीनाका येथील राज्य महामार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी तीनबत्तीनाका येथून चारही दिशांना जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे. मार्ग अडवण्यात आल्याने बाजारपेठेतून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भरणे येथून राज्य महामार्गाच्या कामास सुरू करण्यात आल्यानंतर अण्णाच्या पऱ्यापर्यंत एका बाजूकडील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सहा ठिकाणी विद्युतखांबांचा अडसर उभा ठाकल्याने विद्युतखांबालगतचे काम रखडले आहे. शहरातील गजबजलेल्या तीनबत्ती नाका येथे राज्य महामार्गाच्या कामास सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून, शनिवारपासून प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी नगर प्रशासनाने पर्यायी मार्गाची पाहणी करत नगर परिषदेच्या पाठीमागील मैदानातून सहजीवन हायस्कूलपर्यंत पर्यायी मार्गाची‌ व्यवस्था केली आहे. या मार्गावरून गेल्या काही दिवसांपासून वाहतूक सुरू आहे.
तीनबत्तीनाका येथील राज्य महामार्गाचे काम हाती घेण्यात आल्याने बाजारपेठेत चारही दिशांना जाणारे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना वळसा मारून मार्गक्रमण करावे लागत आहे. तीनबत्तीनाका येथून वाहतुकीस अटकाव करण्यात आल्याने बाजारपेठ, गांधीचौक, निवाचातळमार्गे भरबाजारपेठेतूनच वाहनचालक मार्गक्रमण करत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.
....
चौकट :
थांब्याअभावी प्रवाशांची होतेय फसगत
तीनबत्तीनाका येथील राज्य महामार्गाचे काम सुरू झाल्याने अडवण्यात आलेल्या मार्गामुळे तेथील बसथांबा संपुष्टात आला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असला तरी नेमका बसथांबा कुठे, याचा थांगपत्ता नाही. त्यामुळे प्रवाशांची फसगत होत आहे. याशिवाय थांबासंदर्भात कोणताही फलक नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सह करावा लागत आहे.
---

Mumbai: मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार! मिठी नदीवर नवा उड्डाणपूल उभारणार; मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Viral: ६ बायका, ९५० स्क्रू आणि १५ महिने मेहनत... प्रसिद्ध इंफ्लुएसरनं लाखो खर्चून तयार केला लाखोंचा 'सुपर बेड', कारण...

Pune News : राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हृदयविकार उपचार केंद्रांची उभारणी; १०० कोटींचा निधी मंजूर

Weekly Love Astrology Predictions: धन अन् बुधादित्य राजयोगाची कमाल! मिथुनसह ‘या’ 5 राशींना मिळणार मोठं यश

Pune News : पुणे महापालिकेत नेमकं काय घडतंय? मिळकतकरासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे; फाइल्स गायब, चुकीची माहिती, जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT