देवगड ‘भूमिअभिलेख’मध्ये
विशेष मदत कक्ष स्थापन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात ई-मोजणी व्हर्जन २.० ही नवीन प्रणाली कार्यान्वित झाली आहे; मात्र ऑनलाईन अर्ज भरताना तसेच त्यामध्ये अंतर्भूत बाबींची व अन्य माहिती भरताना बऱ्याचदा नागरिकांना तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना परिपूर्ण माहिती मिळावी व त्यांचे हेलपाटे होऊ नयेत, म्हणून उपसंचालक भूमिअभिलेख कोकण प्रदेश मुंबई व जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, सिंधुदुर्ग यांच्या सुचनांनुसार येथील भूमिअभिलेख कार्यालयात आता विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे. एप्रिल २०२४ पासून जुन्या ऑफलाईन पद्धतीने मोजणी अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे. आता सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाते. ऑनलाईन पद्धतीनेच मोजणी चलनाच्या शुल्काची रक्कम देखील भरणा करता येत असून त्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. विविध प्रकारच्या मोजणी प्रकारांनुसार आवश्यक कागदपत्रे व अन्य बाबींची माहिती मदत कक्षाद्वारे उपलब्ध होईल. मोजणी प्रकारांनुसार आवश्यक बाबींमध्ये हद्द कायम मोजणी प्रकरणांमध्ये गट-सर्व्हे क्रमांकमधील कमीत कमी ३ सहधारक तसेच गट-सर्व्हे नंबरचे चारही दिशांचे लगतधारक यांची पूर्ण नावे व अद्यावत पत्ते, संपर्क क्रमांक, ३ महिन्यांतील सातबारा उतारा, आधार कार्ड व जुने अभिलेख आदी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पोटहिस्सा मोजणी प्रकरणी गट-सर्व्हे क्रमांकमधील सर्व सहधारक तसेच गट-सर्व्हे क्रमांकाचे चारही दिशांचे लगतधारक यांची पूर्ण नावे व अद्यावत पत्ते, संपर्क क्रमांक, ३ महिन्यांतील सातबारा उतारा, आधार कार्ड व जुने अभिलेख अगर हद्द कायम मोजणी झाली असल्यास त्याचा नकाशा व पोटहिस्से करावयाचे क्षेत्राचा हस्तस्केच नकाशा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नियोजन प्राधिकारणाचे तात्पुरते मंजूर रेखांकन व ना हरकत दाखला आदी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. बिनशेती मोजणीसाठी वरील बाबींबरोबरच सक्षम प्राधिकारी यांचे आदेश व मंजूर रेखांकन आराखडा अपलोड करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कक्षाव्दारे नागरिकांना अन्य माहिती पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.