कोकण

हडपीड मठात भक्ती-सेवेचा संगम

CD

24498

हडपीड मठात भक्ती-सेवेचा संगम

महेश इंगळे ः स्वामी समर्थ मठातर्फे सन्मान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १४ ः पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या महानगरांमध्ये स्वामीभक्तांची लक्षणीय संख्या असली, तरी कोकण हे स्वामी भक्तांचे माहेरघर आहे. या माध्यमातून हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती आणि सेवेचा संगम पाहावयास मिळाला, असे मत अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भाजपचे नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व श्री स्वामी समर्थ भक्ती परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ हडपीड मठ यांच्या सौजन्याने महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवारातर्फे आयोजित तीनदिवसीय कोकण दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी हडपीड (ता. देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान या श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थानावरील श्री स्वामी समर्थांचे नित्य दिनक्रम व वर्षभरात मंदिरात साजरे होणारे उत्सव याबाबत इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ मठात भाविकांना मार्गदर्शनपर माहिती दिली. का
कार्यक्रमाच्या प्रारंभी हडपीड मठाच्या वतीने महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी व सर्व मित्र परिवार सदस्यांचा स्वामी समर्थांचे वस्त्र व स्वामी समर्थांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन हडपीड मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी सन्मान केला. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने इंगळे यांनीही प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, ज्ञानेश्वर राऊत, मोहनिष पेडणेकर, अभिषेक राणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.
--------
कोकणातील स्वामीभक्त परिवारात वाढ!
हडपीडसारख्या डोंगराळ व निसर्गरम्य परिसरात सुंदर असे श्री स्वामी समर्थांचे मंदिर साकारून स्वामीभक्तांनी आपली सेवा रुजू केली आहे. यामुळे कोकणातील स्वामीभक्त परिवार वाढत आहे. आम्हाला येथे आमंत्रित करून जी सेवा दिली ती अमूल्य आहे, असे यावेळी इंगळे यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर, डॉ. हिरण्णा पाटील, हडपीड मठाचे संस्थापक प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरण; धीरज घाटे रवींद्र चव्हाणांना भेटणार

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT