कोकण

चढावर ताबा सुटल्यामुळे अवजड ट्रकला अपघात

CD

24536

चढावर ताबा सुटल्यामुळे
अवजड ट्रकला अपघात

ओटवणे तिठा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १४ ः ओटवणे तिठा येथे आज पहाटेच्या सुमारास मालवाहू ट्रकला अपघात झाला. कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने लोखंड घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा चढावर ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
अधिक माहिती अशी, कोल्हापूर येथून लोखंडी माल भरून एक ट्रक गोव्याच्या दिशेने जात होता. विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या नजीक असलेल्या ओटवणे तिठा येथील तीव्र चढावर ट्रक आला असता मालाच्या वजनामुळे ट्रकचा पुढील भाग अचानक उचलला. त्यामुळे ट्रकच्या मागील बाजूस असलेले लोखंड वेगाने खाली आले. सुदैवाने यावेळी ट्रकच्या पाठीमागे कोणतेही वाहन किंवा प्रवासी नसल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांची गर्दी झाली होती. बचाव पथक दाखल झाले होते. या रस्त्याचे काँक्रीट बांधकाम सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी खोदाई केल्याने व योग्य नियोजन नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT