24554
परुळे कोरजाईवाडीत आज महाशिवरात्रोत्सव
म्हापण, ता. १४ ः परुळे कोरजाई आनंदवाडी येथील पाच पांडव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त उद्यापासून (ता. १५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ९ ते १ पर्यंत अभिषेक व पूजा, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजन, ७ वाजता जय गणेश प्रासादिक भजन मंडळ गाडे धाववाडी यांचे भजन, रात्री ८ वाजता विलास केरकर (तारकर्ली) यांचे कीर्तन, सोमवारी (ता. १६) सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे भजन, रात्री ८ वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचे पौराणिक नाटक ‘चौरंगीनाथ महिमा’ होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
...............
रांजेश्वर-तारकर्लीत
विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : तालुक्यातील रांजेश्वर-तारकर्ली येथील श्री सद्गुरू साई मंदिर येथे उद्या (ता. १५) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू साईभक्तांच्या सहकार्याने यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. या महोत्सवांतर्गत उद्या (ता. १५) सकाळी १० वाजता श्री सद्गुरू सखाराम महाराज मठ येथे ‘ग्रंथदर्शन’, सायंकाळी ६ वाजता ‘शिवलीलामृत’ पोथीचे सामूहिक ग्रंथ पठण, गुरुवारी (ता. १९) दुपारी १ ते ३ पर्यंत ‘महाप्रसाद’ वाटप, सायंकाळी ७ वाजता श्री साईबाबांची मंगल आरती, रात्री ८ वाजता ‘भजन महोत्सव’ होणार आहे. यामध्ये महापुरुष महिला भजन मंडळ (वरचीवाडी-तारकर्ली) आणि नाट्य झुंजार मंडळ (तारकर्ली) यांची भजने सादर होतील. रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. या उत्सवात रांजेश्वर-तारकर्ली परिसरातील सर्व ग्रामस्थ, भगिनी आणि साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री सद्गुरू साई मंडळ, रांजेश्वर-तारकर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.