जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने
ओझरवाडी शाळेत हळदीकुंकू
चिपळूण, ता. १५ ः येथील जिजाऊ ब्रिगेडच्या चिपळूण शहर शाखेच्या वतीने ओझरवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या माता आणि पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने महिलांचा सन्मान अधोरेखित केला.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, राजमाता जिजाऊंचे पूजन आणि जिजाऊ वंदनेने करण्यात आली. हळदीकुंकू हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो प्रत्येक महिलेचा सन्मान आहे, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला. विशेष म्हणजे, या समारंभात ‘गंगा-भागीरथी’ (विधवा) आणि ‘सुवासिनी’ असा कोणताही भेदभाव न करता सर्व महिलांना समान मान देऊन आदरातिथ्य करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा शिवमती स्नेहल चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या शिवमती सीमा चाळके, जिल्हा सचिव शिवमती पूर्वा तांदळे, शहर अध्यक्षा शिवमती वर्षा खटके पाटील, उपशहर अध्यक्षा शिवमती अपूर्वाताई गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवमती सुनिता राणे, शिवमती सुनंदा खंडजोडे, शिवमती सुप्रिया साळुंखे, शिवमती समीक्षा करंजकर, शिवमती सानवी धाडवे, शिवमती ममता शिंदे, शिवमती अनामिकाताई हरदारे, शिवमती मनोरमा पाटील आणि शिवमती सुगंधाताई चिवटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.