कोकण

खेळाचा खिलाडूवृत्तीने आनंद घ्या

CD

24709

खेळाचा खिलाडूवृत्तीने आनंद घ्या

दत्तात्रय मारकड ः तोंडवलीत वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १५ ः ‘कोणताही खेळ खेळताना जो खेळाचा आनंद लुटतो, तोच खेळाडू असतो. खेळताना खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे. आजच्या क्रीडा स्पर्धेतून भविष्यात चांगले खेळाडू घडून तोंडवली कॉलेजचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर जाईल,’ असे प्रतिपादन कासार्डे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक तथा ज्युदो-कराटे प्रशिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले. सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी, कृषी, इंजिनिअरिंग कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते तोंडवली येथे बोलत होते.
श्री. मारकड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, कृषी प्राचार्य योगेश पेडणेकर, फार्मसी प्राचार्य मनोज कदम, इंजिनिअरिंग प्राचार्य सूरजकुमार सातवेकर, बी.एड. प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल हिवसे, हंबीरराव देसाई उपस्थित होते.
श्री. मारकड म्हणाले, ‘क्षेत्र कोणतेही असो, जेवढी क्षमता आहे, तेवढी मेहनत घेतली तरच यश आपल्याकडे येते. खेळताना घामाने आंघोळ करणारेच इतिहास घडवतात. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर संयम, जिद्द, शिस्त लागते. त्यामुळे खेळात ईर्षा व संघर्ष करा; मात्र द्वेषभावना ठेवू नका.’
विद्यार्थी प्रतिनिधी निखिल हिवसे, हंबीरराव देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. क्रीडाज्योत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वलित करून स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रतिसाद दर्शवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

Horoscope : उद्या १६ फेब्रुवारीला 'या' ५ राशींचं भाग्य जोरात! घरी येईल पैसा अन् नोकरीत मिळेल मोठं यश, प्रेमसंबंधांना नवे वळण

SCROLL FOR NEXT