कोकण

गावखडीत २१ पायली तांदळाची महापूजा

CD

rat15p11.jpg-
24647
गावखडी ः येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त अकरा खांबाची आणि एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आली आहे.

rat15p12.jpg-
24648
श्रीदेव रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविक

गावखडीत २१ पायली तांदळाची महापूजा
महाशिवरात्रीनिमित्त रामेश्वर मंदिरात उत्सव ; भक्तांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १५ ः ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव च्या जयघोषात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गावखडी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली असून संपूर्ण परिसर शिवभक्तीने न्हाऊन निघाला आहे.
श्री देव रामेश्वर हे नवसाला पावणारे देवस्थान असल्याने केवळ जिल्हाच नव्हे, तर मुंबई, पुणे आणि राजापूर अशा विविध ठिकाणाहून माहेरवाशिणी आणि भाविक पाच दिवसांच्या या महोत्सवासाठी गावखडीत दाखल झाले आहेत. महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी मंदिरात बांधली जाणारी ''११ खांबांची आणि २१ पायली तांदळाची'' महापूजा हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. अशा प्रकारची तांदळाची महापूजा अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते. यासाठी भाविक अत्यंत भक्तीभावाने तांदूळ अर्पण करतात. ही विलोभनीय पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा शिवरात्री महोत्सव सलग पाच दिवस म्हणजेच १२० तास चालतो. या काळात विविध क्रीडा स्पर्धा, नाट्य प्रयोग, भजन-कीर्तन, पालखी सोहळा आणि विधिवत आरती अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. रविकिरण धर्माजी तोडणकर, देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. पद्माकर तोडणकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवभक्तांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत मंगलमयी वातावरणात पार पडत आहे. गावखडीतील या महोत्सवामुळे संपूर्ण तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT