कोकण

सिंधुदुर्ग किल्ला परिसराची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

CD

24773

सिंधुदुर्ग किल्ला परिसराची
विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ युनिटतर्फे १३ व १४ फेब्रुवारीला दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मालवणचा समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक जबाबदारीचा आदर्श जपला. शिबिराच्या पहिल्या दिवशी येथील चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे किनाऱ्यावर जमा झालेला प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू स्वयंसेवकांनी एकत्रित केल्या. दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक ''किल्ले सिंधुदुर्ग'' येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. गडाच्या तटबंदीचा परिसर आणि पर्यटन मार्गावरील कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. या यशस्वी उपक्रमासाठी संस्थेचे सिद्धेश शिंदे, साई पवार, दीपिका फर्नांडिस, सुदेश जामसंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ विद्यार्थी साहिल शिंदे यांनी शिबिरासाठी आवश्यक साहित्याची जबाबदारी सांभाळली. अशोक सावंत यांनी संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT