कोकण

भारतीय संस्कृतीशी नाळ जोडणारी अमेरिकेची ''आर्या''

CD

-rat१५p३१.jpg-
२६O२४७४४
चिपळूण ः पेटी वाजविण्याचे प्रशिक्षण घेणारी आर्या.

-rat१५p३२.jpg-
P२६O२४७४५
चिपळूण ः येथील गुरुकुलच्या वर्गात सहभागी आर्या.
----------
अमेरिकेत शिक्षण, गुरुकुलमध्ये संस्कार
शिकागोतील ‘आर्या’ला भारतीय संस्कृतीची ओढ ; चिपळूण युनायटेडच्या गुरुकुलमध्ये तीन वर्षे सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ : पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातही भारतीय संस्कार आणि संस्कृतीची ओढ कायम राखता येते, याचे उत्तम उदाहरण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील शिकागो येथे राहणारी ‘आर्या रोहित सलग तीन वर्षांपासून आपल्या सुटीत चिपळूणच्या ‘युनायटेड गुरुकुल’ विभागात येऊन भारतीय शिक्षण पद्धतीचा अनुभव घेत आहे.
परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये ‘पंचकोशाधारित गुरुकुल’ पद्धत राबवली जाते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास येथे केला जातो. भारताच्या या प्राचीन शिक्षण पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी ‘आर्या’ दरवर्षी अमेरिकेहून भारतात येते.
शिकागोमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारी ‘आर्या’, अमेरिकेतील शाळेला सुटी लागली की आवर्जून चिपळूणला येते. गुरुकुलच्या सकाळी उपासनेपासून सुरू होणाऱ्या अकरा तासांच्या दिनक्रमात ती उत्साहाने सहभागी होते. प्रार्थना, व्यायाम, योगासने, संगीत आणि हस्तकौशल्यासोबतच भात लावणी, आषाढी एकादशी साजरी करणे, गणेशमूर्ती तयार करणे आणि निवासी शिबिरे अशा विशेष उपक्रमांतही ती हिरिरीने भाग घेते. पाश्चात्त्य शिक्षणासोबतच भारतीय संस्कारांची शिदोरी सोबत असावी, यासाठी ‘आर्या’ आणि तिचे पालक घेत असलेला हा पुढाकार सध्या चिपळूण परिसरात कौतुकाचा आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
-----
चौकट
आईच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद
आर्याची आई ‘संपदा’ या युनायटेड इंग्लिश स्कूलच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले रोहित आणि संपदा सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र, आपली मुलगी पाश्चात्त्य जीवनशैलीत वाढत असताना तिला भारतीय संस्कृती, परंपरा आणि इथली शिक्षण व्यवस्था कळावी, या उद्देशाने त्यांनी ‘आर्या’ला या गुरुकुलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. ‘आर्या’ हिनेही आपल्या आईच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय संस्कृतीचा हा वसा आनंदाने स्वीकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT