कोकण

एमए पत्रकारिता, लोकसेवा अभ्यासक्रम

CD

मुंबई विद्यापीठ उपपरिसरात
नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर कार्यालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून काही नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. एम.ए. पत्रकारिता आणि एम.ए. पब्लिक सर्व्हिस (लोकसेवा) हे दोन अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत.
दोन्ही अभ्यासक्रमांची पात्रता कोणतीही पदवी असून कालावधी दोन वर्षांचा आहे. एम.ए. पब्लिक सर्व्हिस अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग १ व २ पदांच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असून बहुविद्याशाखीय पद्धतीने रचना करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असून सुसज्ज ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला पूरक असा हा नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी आणि पदव्युत्तर पदवी एकाच वेळी पूर्ण करणे शक्य होणार आहे.
याशिवाय एलएल.बी. (३ वर्षे) व एलएल.बी. (५ वर्षे) अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या एमएच-सीईटी, विधी प्रवेश परीक्षेसाठी वाचन कक्ष, ग्रंथालय, तसेच गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि कायद्याचे ज्ञान या विषयांवरील मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किमान दहा जणांनी मागणी केल्यास नोंदणीनंतर त्वरित मार्गदर्शन सुरू करण्यात येईल, असे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT