विद्यार्थ्यांना अनुवादाचे बळ
‘गोगटे’त अभ्यासक्रमाचे, प्रमामपत्र वितरम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने पीएम-उषाअनुदान अंतर्गत राबविण्यात आलेल्या ३० तासांच्या अनुवाद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरण रत्नागिरी दीपस्तंभ व डी. जी. पी. एस. स्टेशनचे सहायक अभियंता ललित प्रकाश उपस्थित होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, ‘आजच्या स्पर्धात्मक युगात अनुवाद कौशल्याला मोठे महत्त्व आहे. हिंदी, मराठी व इंग्रजीसारख्या भाषांतील अनुवादामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण होतात. महाविद्यालयात राबविण्यात येणारे असे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमतेत भर घालणारे आहेत.’
अध्यक्षीय भाषणात प्रमाणपत्र कोर्स समन्वयक डॉ. यास्मीन आवटे यांनी पत्रकारिता, माध्यमे, प्रशासन, शिक्षण व उद्योग क्षेत्रात अनुवादाच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमास पीएम-उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे समन्वयक प्रा. कृष्णात खांडेकर यांनी अभ्यासवर्गाची संकल्पना व अभ्यासक्रमाची माहिती दिली. यानंतर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रा. गौरी बोटके यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.