संत सेवालाल जयंतीनिमित्त
देवरूख शहरात मिरवणूक
चिपळूण, ता. १६ ः बंजारा समाजाचे परमपूज्य गुरू, संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांची जयंती बंजारा समाज सेवा संघातर्फे देवरूख-पाटगाव येथे रविवारी (ता. १५) विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त देवरूख येथे मिरवणूक काढण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बंजारा समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी मिरवणुकीला विशेष शोभा आणली, हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. या जयंती सोहळ्याला संगमेश्वर तालुका बंजारा समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किरण पवार, उपाध्यक्ष अशोक राठोड, माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक, सचिव सागर राठोड, खजिनदार अशोक चव्हाण यांच्यासह शिवाजी राठोड, रवी पवार, अशोक जाधव, तुकाराम पवार, शंकर राठोड, अप्पू शंकर राठोड, मिथुन पवार, पुंडलिक राठोड, बाबू राठोड आदी बंजारा समाजबांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.