कोकण

कणकवलीत चार फुटी विषारी घोणस आढळला

CD

24903

कणकवलीत चार फुटी
विषारी घोणस आढळला

कणकवली, ता. १६ : शहरातील फौजदारवाडी परिसरात एका विषारी घोणस सापाने दर्शन दिल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. येथील रहिवासी नवनीत बागवे यांच्या घराशेजारी असलेल्या अडगळीच्या ठिकाणी हा साप आढळला. घराशेजारील मांजर अचानक जोरजोराने ओरडू लागल्यामुळे घरातील सदस्यांचे लक्ष त्या बाजूला गेले आणि हा साडेचार फूट लांबीचा विषारी साप निदर्शनास आला. सर्पमित्र अवधूत पाटील व दत्तू मेस्त्री यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने विषारी सापाला सुरक्षितरीत्या पकडले. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळल्याने स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT