सकल मराठा समाजातर्फे
कणकवलीत शिवजयंती
कणकवली, ता. १६ : सकल मराठा समाज, कणकवलीतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौकात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव आयोजित केला आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ कार्यक्रम आणि स्वरसंधार ग्रुप कणकवली यांची ‘भक्तिगीतांची जुगलबंदी’ सादर होणार आहे.
शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी साडेनऊला शिवप्रतिमेचे पूजन, त्यानंतर रक्तदान शिबिर (सौजन्य : नवजीवन ब्लड सेंटर कणकवली), कणकवली तालुका मराठा समाज आणि मराठा प्राथमिक शिक्षक समाज बांधवांतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, सायंकाळी सहाला स्वरगंधार ग्रुप कणकवलीतर्फे ‘भक्तिगीतांची जुगलबंदी’ होईल. यात सुंदर मेस्त्री आणि दुर्गेश मिठबावकर यांचे गायन हाईल. त्यांना पखवाज साथ तुषार लोट, तबला साथ मेघपर्ण एकावडे यांची आहे. रात्री साडेनऊला साईकला मंच निर्मित ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.