कोकण

मराठी साहित्य स्पर्धेत ''पारख''ला प्रथम क्रमांक

CD

swt168.jpg
24918
बडोदा ः गौरी कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मराठी साहित्य स्पर्धेत
‘पारख’ला प्रथम क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत गोव्याच्या (मालपे-पेडणे) गौरी कुलकर्णी यांच्या ‘पारख’ या कथेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता बडोदे येथील ब्राह्मण सभेच्या कानिटकर सभागृहात उत्साही वातावरणात झाला. महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भालचंद्र भणगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच हस्ते गौरी कुलकर्णी यांना पारितोषिक प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ​
याप्रसंगी व्यासपीठावर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख संजय करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन बृहन्महाराष्ट्र मंडळाचे गुजरात विभागाचे विभागीय कार्यवाह डॉ. धनंजय मुजुमदार यांनी केले. अखिल भारतीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत अनेक दर्जेदार साहित्यिकांनी सहभाग घेत. ज्यामध्ये गौरी कुलकर्णी यांच्या कथेने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या मार्गातील 'मोठा' अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास २८ पर्यंत मुदतवाढ

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT