swt162.jpg
24912
घारपी ः शाळेत ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.
‘ज्ञानगंगा’ मुलांच्या विचारांचे प्रतिबिंब
आर. बी. गावडे ः घारपी शाळेत हस्तपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः विद्यार्थ्यांची सुप्त सर्जनशीलता जागृत करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. ‘ज्ञानगंगा’ हा केवळ लेखनसंग्रह नसून विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा आरसा आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची अभिव्यक्ती अधिक सक्षम होते, असे गौरवोद्गार केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांनी काढले. घारपी शाळेत प्रकाशित ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तिकेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, जिद्दीचा आणि कल्पनाशक्तीचा अनोखा आविष्कार ठरलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तिकेचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांची समाधानाची पावती या सोहळ्याला विशेष अर्थ देणारी ठरली.
विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या लेखनकौशल्याला चालना मिळावी तसेच विचारशक्ती आणि सृजनशीलतेचा विकास व्हावा, या हेतूने ‘ज्ञानगंगा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या हस्तपुस्तिकेत विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता, कल्पनारम्य व वास्तवदर्शी कथा, अनुभवकथन, प्रवास वर्णन, आकर्षक चित्रकला, विज्ञानविषयक माहिती, सामान्यज्ञान, गणिती कोडी तसेच विविध शालेय उपक्रमांचे सुबक व सुंदर संकलन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते ‘ज्ञानगंगा’चे औपचारिक प्रकाशन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करत लेखन, वाचन आणि सृजनशील उपक्रमांमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन केले. सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे आणि धर्मराज खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या परिश्रमांमुळेच हा उपक्रम यशस्वीपणे साकार झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पालकांनीही शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. घारपी शाळेचा हा अभिनव उपक्रम सर्व शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण शाळा परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.