कोकण

जिव्हाळा आश्रमाची वृध्दसेवा प्रेरणादायी

CD

swt163.jpg
24913
माड्याचीवाडी ः जिव्हाळा सेवाश्रमच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील गौरवमूर्तींसमवेत दादा बिर्जे, अनिल बर्वे, साक्षी बिर्जे, अस्मिता गावडे, राजू बिर्जे व इतर मान्यवर.


जिव्हाळा आश्रमाची वृध्दसेवा प्रेरणादायी
अनिल बर्वे ः माड्याचीवाडीत वर्धापनदिनी गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः वृद्धांची परमेश्वररूपी सेवा करण्याचे ‘जिव्हाळा’चे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कणकवली येथील ज्येष्ठ वकील अनिल बर्वे यांनी जिव्हाळा सेवाश्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यानिमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दहा जणांना  ‘जिव्हाळा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा शनिवारी (ता. १४) जिव्हाळा सेवाश्रम येथे आयोजित करण्यात आला. यावेळी माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, उपसरपंच अस्मिता गावडे, संतोष शेटगावकर, रामकृष्ण सामंत, उपाध्यक्ष राजू बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, सुंदर मेस्त्री, अरुण परब, दत्तात्रय पाटकर, दीपाली पाटकर, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, शोभा बिर्जे, गीतांजली बिर्जे, आर्या बिर्जे, श्रेया बिर्जे, प्रशांत केरवडेकर, बाबा गावडे आदी उपस्थित होते.
बर्वे म्हणाले, ‘‘जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे, त्यांचे कुटुंबीय आणि विश्वस्त हे गेली दहा वर्षे सामाजिक बांधिलकी ठेवून वृद्धांची मनोभावे सेवा करीत आहे. मानवसेवेचा अखंड झरा वाहणारे काम जिव्हाळा सेवाश्रमातून होत असून हे निश्चितच समाजासाठी प्रेरणा देणारे आहे.’’
संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे यांनी, गेली दहा वर्षे हे सेवाकार्य सुरू असून भविष्यातही अनेक उपक्रम हाती घेतले जातील, असे सांगितले. यावेळी ‘जिव्हाळा गौरव’ पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा खानोलकर, ''सकाळ'' कुडाळ तालुका बातमीदार अजय सावंत, माणिक पवार, प्रसाद परब, उदय आईर, रवी कुडाळकर, वैशाली देसाई, नीतेश तांबे, केदार देसाई, साक्षी शेलटे यांना गौरविण्यात आले. नवनियुक्त तेंडोली जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, पाट पंचायत समिती सदस्या प्राची जळवी यांचाही सत्कार करण्यात आला.
जिव्हाळा सेवाश्रम संगीत विद्यालयाचे शिक्षक योगेश प्रभू, आनंद मोर्ये तसेच त्यांच्या शिष्या ऐश्वर्या चव्हाण, जुही राऊळ यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक जयप्रकाश प्रभू यांनी केले. संतोष सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार साक्षी बिर्जे यांनी मानले. मोर्ये, प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गायन-वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच कार्यक्रमात अन्वेश बिर्जे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात बॅ. नाथ पै महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्रा. श्रीमती ओटवणेकर यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर, फळवाटप, दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT