कोकण

चिपळूणात रंगरेषांमधून गांधी विचारांचा जागर

CD

- rat१६p३.jpg-
P२६O२४८८६
चिपळूण : येथील गांधी प्रतिष्ठान तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.

गांधी विचारांची रंगयात्रा
चिपळुणात चित्रकला स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : येथील पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी समाधी स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला चिपळूण परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत दलितमित्र तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली.
गांधी विचारांचा प्रसार आणि तरुण पिढीला त्यांच्या जीवनकार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गट इयत्ता ५ वी ते ७ वी आणि माध्यमिक गट इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटासाठी ‘गांधीजी व चरखा’ आणि माध्यमिक गटासाठी ‘दांडीयात्रा’ हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या रंगरेषांच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग कागदावर हुबेहूब साकारले.
या कार्यक्रमाची सुरुवात अमृता आशय होमकळस यांनी फुलांनी केलेल्या समाधीच्या आकर्षक सजावटीने झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी प्रास्ताविक केले. सई वरवाटकर यांनी सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना बापू काणे, कुमार कोवळे आणि सुरेंद्र श्रीकांत देवळेकर यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक अ. र. शिगवण व एस. ए. कुंभार यांनी केले.
--------
स्पर्धेचा निकाल

या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः प्राथमिक गट (प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ याप्रमाणे) ः श्रवण प्रकाश राडये (सती हायस्कूल), आर्या नितीन तावडे (दलवाई हायस्कूल), श्रेयस संजय भोसले (कापरे प्रा. शाळा), दीपिका रवींद्र गवळे (सती हायस्कूल), चिन्मय प्रशांत काणेकर (परांजपे हायस्कूल). माध्यमिक गट : अदिती अप्पासाहेब शेंगडे (सावर्डे हायस्कूल), दुर्वांग प्रमोद जाधव (दलवाई हायस्कूल), स्वरा मनोज पाथरे (परांजपे हायस्कूल), दक्ष दिनेश गिजये (सती हायस्कूल), ताहुरा वासिम पटवेगार (महाराष्ट्र हायस्कूल).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT