rat16p12.jpg-
24935
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिराच्या आवारातील बारवावर महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत बारवावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीला बारव उजळला दीपोत्सवाने
श्री भैरी देवस्थान; महाराष्ट्र बारव मोहिमेद्वारे स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिराच्या आवारात प्राचीन बारव आहे. चारही बाजूंनी पायऱ्या असलेला हा तलाव रत्नागिरीचे वैभव असून महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत या तलावाची स्वच्छता करण्यात आली. महाशिवरात्रीचे औचित्य साधून काल रात्री या बारवाच्या पायऱ्यांवर पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात महाशिवरात्रीनिमित्त जवळपास ३०० पुरातन बारवांवर दीपोत्सव केला जातो. या अंतर्गत यावर्षी ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान आवारातील पुरातन बारव बारव मोहिमेच्या स्वयंसेवकांनी सजवला. ग्रामदैवत कालभैरव मंदीराला शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच जवळच २५० वर्षांहून अधिक जूने बारव आहे. बारवाच्या कालखंडाबाबत कुठेही लिखित उल्लेख अद्याप आढळलेला नाही. मात्र बांधकाम पद्धतीवरून हा बारव २०० वर्ष जुने असावी असा अंदाज तज्ज्ञांनी मांडला.
महाशिवरात्रीनिमित्त भैरी-तृणबिंदूकेश्वर मंदिरात उत्सव साजरा होतो. यावर्षीपासून या बारवावर दीपोत्सवा च्या कार्यकमाची भर पडली आहे. श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांनी यावर्षी पासून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो दर महाशिवरात्रीला करावा किंबहुना अशी एक परंपराच व्हावी असा मानस व्यक्त केला.
बारव मोहिमेचे रत्नागिरीतील कार्यकर्ते श्रीरंग मसुरकर, ओंकार आठवले, अमित आणि रंजिता सूर्यवंशी, अशोक जाधव, सायली बिर्जे, विवेक साठे, राधेय पंडित, ड्रोन फोटोग्राफर सुकुमार भाटवडेकर, भैरी मंदिरातील व्यवस्थापक प्रथमेश गोठणकर आणि गावडे काका यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. पणत्या लावून बारव सजविण्यात आला.
मंदिरात उत्सवाला येणाऱ्या लोकांनीही या या सजविलेल्या बारवेवर येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच सिग्मा सर्व्हिसेसचे करकरे कुटुंबीय आणि नाचणे येथील ओनेस्ट गुरुकुल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मसुरकर- शिंदे यांनी सहकुटुंब उपक्रमात सहभाग घेतला.
कोट
पुढच्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात सहभागी नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावे. तसेच या प्रकारच्या आणखी बऱ्याच बारव कोकणातल्या अनेक शिवमंदिरांजवळ आहेत. अशी परंपरा प्रत्येक शिवमंदिरात सुरू व्हावी.
- श्रीरंग मसुरकर, कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.