कोकण

बॅ. नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणात अनेक त्रुटी

CD

बॅ. नाथ पै सभागृहाच्या
नूतनीकरणात अनेक त्रुटी

नाट्य संयोजकांची नगराध्यक्षांकडे तक्रार

​सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः येथील नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण चुकीच्या पद्धतीने झाले असून, यामुळे नाट्य प्रयोगांसाठी हे सभागृह आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची तक्रार नाट्य संयोजकांनी केली आहे. या संदर्भात संयोजकांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.
​संजय चिटणीस (सावंतवाडी), नागेश नेमळेकर (कुडाळ), गिरीश महाजन (कोल्हापूर) आणि विकास पावसकर (मुंबई) या नाट्य संयोजकांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, नूतनीकरण करताना सभागृहात खुर्च्यांची संख्या कमी ठेवली आहे. स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणात मोकळी जागा सोडली असून, तिथे अतिरिक्त १२० ते १५० खुर्च्या बसवणे शक्य आहे. सध्याच्या कमी आसनक्षमतेमुळे नाटकाचा खर्च निघणे कठीण होत असून आयोजकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. नाईलाजास्तव मोकळ्या जागेत प्लास्टिकच्या खुर्च्या लावून प्रेक्षकांना बसवावे लागते. तसेच सध्या असलेल्या खुर्च्यांपैकी १२ ते १५ खुर्च्या मोडलेल्या असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.
​याशिवाय, नूतनीकरणापूर्वी मेकअप रुममध्ये असलेल्या खुर्च्या, टेबल आणि आरसे यांसारख्या सुविधा आता काढून टाकल्या आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या नामवंत कलाकारांची मोठी गैरसोय होत आहे. मेकअप रुममध्ये साधे टेबल किंवा बसण्यासाठी खुर्ची नसल्याने कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. ​सभागृहातील या सर्व त्रुटींची आणि गैरसोयींची नगरपरिषद प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, स्टेजसमोरील भागात कायमस्वरुपी खुर्च्या बसवाव्यात आणि मेकअप रुममधील सुविधा त्वरित पूर्ववत कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT