-rat१६p११.jpg-
२६O२४९२५
गुहागर ः येथील श्री देव व्याडेश्वराची पूजा करताना यजमान.
---
व्याडेश्वर नगरीत शिवभक्तीचा जागर
महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम; नाण्यांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १६ : शहरातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वराच्या महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. महाशिवरात्रीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. उत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्राचीन नाण्यांच्या प्रदर्शनालाही पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.
गुहागरचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव व्याडेश्वर मंदिराचा महाशिवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. पहाटेपासूनच मंदिरात पूजा व लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर शहरातील विविध भजनी मंडळांची सुस्वर भजने पार पडली. रात्री ‘श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ, चिखली’ यांचे वारकरी कीर्तन झाले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळमृदंगाच्या नादात श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्थानिक ग्रामस्थांसह व्याडेश्वर ज्यांचे कुलदैवत आहे, असे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल (देवगड) येथील ओंकार कदम यांनी संकलित केलेल्या २२० देशांतील नाणी व चलनी नोटांचे प्रदर्शन. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी विशेष पसंती दिली आहे.
----
व्याडेश्वर महोत्सवाचे आयोजन
श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड यांच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ‘व्याडेश्वर महोत्सव’ पोलीस परेड मैदानात आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १७) सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर जादूचे प्रयोग हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता विघ्नेश जोशी यांचा पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मराठी असे आमची मायबोली’ हा गप्पा, गाणी आणि किस्से यांचा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.