-rat१६p१३.jpg-
P२६O२४९५६
सावर्डे : वालावलकर रुग्णालयानजीक ओढ्याच्या पात्रातील प्लास्टिक पिशव्यांचा खच.
-----
सावर्डेतील रुग्णालयालगत
सावर्डेतील आरोग्य सेवेला कचऱ्याचा वेढा
रुग्णालयालगत ओढ्यात प्लास्टिकचा खच ; कचरा गाडीची वेळ निश्चित नाही, नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १६ : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयाचा परिसर सध्या कचरा आणि दुर्गंधीच्या विळख्यात सापडला आहे. रुग्णालयालगत असलेल्या ओढ्याच्या पात्रात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक आणि मुक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे वाढत्या लोकसंख्येसोबत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रुग्णालयाजवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, ओला कचरा आणि खराब अन्नपदार्थ फेकले जात आहेत. यामुळे वाहत्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित होत असून पावसाळ्यात किंवा प्रवाहाच्या वेळी हा कचरा पुढे वाहून जात पर्यावरणाची हानी करत आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कर्मचारी आणि नोकरदार भाड्याच्या घरात राहतो. मात्र, ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन गाडीच्या वेळा अत्यंत अनियमित असल्याने नोकरदार वर्गाची मोठी अडचण होत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी गाडी उपलब्ध नसल्याने किंवा निश्चित वेळ नसल्याने कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने अनेकजण रात्रीच्या वेळी किंवा कामावर जाताना ओढ्याच्या पात्रात कचरा फेकत असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्याचा सर्वाधिक फटका परिसरातील गुरांना बसत आहे. अन्नाच्या शोधात असलेल्या गाई आणि इतर जनावरे प्लास्टिकच्या पिशव्यांसह उष्टे अन्न खातात.
स्थानिक ग्रामपंचायतीने कचरा संकलनाची वेळ निश्चित करावी आणि ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अथवा त्या ठिकाणी कचराकुंडी ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे. सावर्डेमध्ये निवासी संकुलामध्ये कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटेची नवी यंत्रणा राबविण्याची गरज आहे.
-------
कोट
प्लास्टिक पोटात गेल्याने जनावरांच्या पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे त्यांना वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागते. प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरांची भूक मंदावते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या दुग्धोत्पादनावर होतो.
--डॉ. संदीप कदम, पशुवैद्यकीय अधिकारी, गोकूळ दूध संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.