शिवजयंतीनिमित्त उद्या
वरवडेतून दुचाकी रॅली
कणकवली, ता. १७ : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवारी (ता.१९) वरवडे ते कणकवली अशी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
रॅलीचे हे नववे वर्ष आहे. सकाळी ११ वाजता वरवडे येथून रॅलीचा प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ बाजारपेठेत दाखल होईल. त्यानंतर ही रॅली कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात येईल. तेथून बाजारपेठमार्गे रेल्वे स्थानक, तेथून तेथून नरडवे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होईल. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी रॅलीच्या मार्गातील ठिकठिकाणी असलेल्या शिवजयंती उत्सवांनाही भेटी देण्यात येणार आहेत. दरम्यान शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे दिवसभरात व त्यानंतरही विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक, युवा नेते प्रताप भोसले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.