गोवळकोट येथे रंगली खो-खो स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः शहरातील गोवळकोट येथील वक्रतुंड क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक खो-खो स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (ता. १६) सायंकाळी माजी आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते झाले. ही शालेय स्तरावरील स्पर्धा असून, तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांचे अनेक संघ सहभागी झाले आहेत.
गोवळकोट येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक प्रमोद बुरटे, उदय जुवळे, विकी लवेकर, राष्ट्रीय पंच प्रशांत देवळेकर, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अंकुश आवले, तुषार रेडीज, भैय्या वरवटकर, दया जुवळे, नगरसेवक संजय गोताड व विलासशेठ खेराडे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी वक्रतुंड क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू बुरटे, प्रतीक गोरिवले, ऋषिकेश हरवडे, वृषभ बेचावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.