चिपळुणात आरोग्य तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : ‘हिंद की चादर’ म्हणून जगभर ओळखले जाणारे शीख धर्मगुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त चिपळूण नगर परिषदेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (ता. १६) नागरिक आणि कर्मचारी यांच्यासाठी आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराने उत्साहात करण्यात आला.
चिपळूण नगरपालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. हे शिबिर अपरांत हॉस्पिटल आणि चिपळूण नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आले. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. शताब्दी वर्षानिमित्त शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुभेच्छा देताना सांगितले, गुरू तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग आणि शौर्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नगर परिषदेचे पूर्ण सहकार्य राहील.
या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, वैशाली कदम, शिल्पा देसाई, शीतल रानडे यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहित खाडे व सर्व विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.