कोकण

शिक्षक मेळाव्यात संकल्पपूर्तीचा निर्धार

CD

25152

शिक्षक मेळाव्यात संकल्पपूर्तीचा निर्धार

शशांक आटक ः कसालमध्ये केंद्रस्तरीय ‘चेतना मेळावा’ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः ‘केंद्रस्तरीय मेळाव्यामुळे सर्व शिक्षकांशी तालुका संघटनेचा संपर्क अधिक दृढ व भक्कम झाला. शिक्षकांच्या समस्या तालुका संघटनेला जाणून घेता आल्या आणि त्यांच्या समस्यावर मार्गदर्शनही करता आले,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कुडाळचे तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी दिली.
तालुक्यातील कसाल केंद्रामध्ये केंद्रस्तरीय चेतना मेळावा उत्साहात झाला. मेळाव्याचे संपूर्ण नियोजन केंद्र संघटक संतोष तेरसे व त्यांच्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्कृष्टरीत्या केले. मेळाव्यास ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, तालुकाध्यक्ष शशांक आटक, प्रवक्ते संतोष वारंग, शिक्षक नेते प्रसाद वारंग, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, महिला आघाडी अध्यक्ष संजना पेडणेकर, सचिव सुगंधा अणावकर, शिक्षक पतपेढी संचालक विजय सावंत, संजय गावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोपाळ गावडे, आप्पा सावंत, देवगड तालुका ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. मिराशी, कार्याध्यक्ष महेश कुंभार, माजी सचिव स्वामी सावंत, दत्ता तवटे, आबा पाताडे, कसाल बालमवाडी शाळेचे मुख्याध्यापक गोसावी, केंद्रातील सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
मेळाव्याप्रसंगी आयोजित विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग-वर्षा परब, विषय व्यक्ती अभ्यास जिल्हास्तरीय निपुण साहित्य-मानसी सावंत व श्रीमती झोरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रसंघटक तेरसे यांनी प्रास्ताविकात केंद्रातील सदस्यांच्या समस्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. काशिराम नाईक यांनी निवेदन केले. धनश्री झोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT