कोकण

केळशी किनारी रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

CD

rat१७p१४.jpg-
P२६O२५१२४
दापोली - विजयी झाल्यावर पारितोषिक घेताना अॅड. पंकज मयेकर यांचा भाऊ ओंकार मयेकर

केळशी किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार
१७ जणांचा सहभाग; ॲड. पंकज मयेकरांचे यश
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १७ : फेसाळणारा समुद्रकिनारा आणि त्यावर धावणाऱ्या बैलगाड्यांचा थरार... अशा अत्यंत रोमांचक वातावरणात केळशी येथे रंगलेल्या बैलगाडी शर्यतीत आंजर्ले येथील ॲड. पंकज मयेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वकिली व्यवसायासोबत जपलेल्या मयेकर यांच्या छंदाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
शिवजयंतीनिमित्त १५ रोजी केळशी समुद्रकिनारी ‘शिवतेज मित्रमंडळ, केळशी’ यांच्यावतीने शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण १७ बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता. समुद्रकिनाऱ्यावर विशेषरितीने तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर बैलांचा वेग, ताकद आणि चालकाचे नियंत्रण यांची कसोटी लागली. प्रत्येक फेरीत स्पर्धकांनी आपल्या जोडीसह उत्कृष्ट समन्वय साधत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. आयोजकांनी शर्यतीदरम्यान सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले होते. ‘ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक क्रीडाप्रकारांना चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते,’ असे शिवतेज मित्रमंडळाच्यावतीने सांगण्यात आले. या उपक्रमामुळे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
------
स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक : ॲड. पंकज मयेकर (आंजर्ले)
द्वितीय क्रमांक : नीतेश बोरकर (पाळंदे)
तृतीय क्रमांक : सुबोध बोरकर (पाळंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुधारणेचे फायदे मिळणार? मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाचा अर्थ काय?

गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर माफी मागायला पनवेलच्या जंगलात पोहोचला; तिच्या आत्म्याला बोलावल्याचा दावा, तरुणाला अटक

Army Recruitment Update : नोकरीसाठी सुवर्णसंधी! माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सैन्य दलात भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

IRE vs ZIM सामन्यावर पावसाचं सावट; जर मॅच झालीच नाही तर ऑस्ट्रेलियाचं काय होणार? धक्कादायक निकाल

नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईकांची एकाधिकारशाही, मंदा म्हात्रे समर्थकांना पुन्हा डावलल्याने भाजपातील अंतर्गत संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT