सावर्डे केंद्रात दहावीचे
४७० परिक्षार्थी
सावर्डे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच १०वी परीक्षेसाठी सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सज्ज झाले आहे. या केंद्रावर एकूण ४७० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्र संचालकांनी दिली आहे. सावर्डे केंद्रांतर्गत शावजीराव लक्ष्मणराव निकम माध्यमिक विद्यालय (कोसबी फुरूस), शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय (निवळी), रत्नसागर इंग्लिश स्कूल (दहिवली), न्यू इंग्लिश स्कूल (मांडकी), अली पब्लिक स्कूल (सावर्डे), इंग्लिश मीडियम स्कूल (सावर्डे) या शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे. केंद्राचे कामकाज केंद्र संचालक अशोक शितोळे आणि उपकेंद्र संचालक नारायण कालप यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी संपूर्ण केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असणार आहे. परीक्षेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास तत्काळ केंद्र संचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.