कोकण

धुळीच्या त्रासाने वाहनधारक त्रस्त

CD

rat१७p१८.jpg-
२६O२५१३८
देवरूख ः कळकदरा ते ओझरे रस्त्यावर मातीमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
----
‘कळकदरा-ओझरे’वर धुळीचा त्रास
मोऱ्यांच्या कामात नियोजनाचा अभाव; दुचाकीस्वारांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः तालुक्यातील कळकदरापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या दुपदरीकरणामुळे प्रवाशांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. कळकदरा ते ओझरे गावापर्यंतच्या टप्प्यात १४ ते १५ नवीन मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत; मात्र या मोऱ्यांवर मातीचा भराव टाकताना रस्ते पातळीचा कोणताही निकष पाळला गेलेला नाही. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत असून, अपघातांचे सत्र सुरू झाले आहे.
रस्त्याचे काम करताना जुना रस्ता आणि नवीन मोऱ्यांवरील भराव यांची पातळी समान ठेवणे आवश्यक असते; मात्र, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर जागोजागी उंचवटे आणि खड्डे तयार झाले आहेत. यामुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून, प्रवाशांना पाठीचे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या घाटातून मार्लेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ आहे. रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाणी मारले जात नसल्याने वाहनांमागे धुळीचे प्रचंड लोट उसळत आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्या भाविकांची या धुळीमुळे अक्षरशः ‘रंगपंचमी’ होत आहे. समोरचा रस्ता न दिसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. विशेषतः वळणदार रस्त्यावर धुळीमुळे दृश्यमानता कमी झाल्याने भीषण अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित ठेकेदाराकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
----
चौकट
नियमित पाणी मारा
सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित खात्याने या मार्गाची तातडीने पाहणी करावी. रस्त्यावर नियमित पाणी मारण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत आणि मोऱ्यांवरील भरावाची पातळी तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT