कोकण

प्रचितगडावर दुर्ग संवर्धनाचा जागर

CD

- rat७p२२.jpg-
२६O२५१६०
संगमेश्वर ः प्रचितगडावरील दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी सेवेकरी.
----
प्रचितगडावर दुर्ग संवर्धनाचा जागर
‘संगमरत्न’चा पुढाकार; ३८ दुर्गप्रेमींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः किल्ले प्रचितगडावर संगमरत्न फाउंडेशनतर्फे सातवी गडसंवर्धन मोहीम फत्ते करण्यात आली. १४ व १५ फेब्रुवारी रोजी संगमरत्न फाउंडेशनतर्फे प्रचितगडावर ही मोहीम पार पडली. यात संवर्धनाचे कार्य हाती घेतलेले ३८ सेवेकरी सहभागी झाले होते.
गडावरील आई भवानीमातेच्या मंदिरासमोरील वाढलेले गवत, रानटी झाडे साफ करून तेथे मातीत गाडले गेलेले पुरातन वाड्यांचे चौथरे, अवशेष साफ करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त प्रथमच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडाच्या महादरवाजापासून मोठ्या जल्लोषात फुलांची उधळण करत छत्रपती शिवरायांच्या नामाचा जयघोष करत मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री देवीची आरती, भजनाच्या नादाने परिसर मंगलमय झाला. चढाईसाठी अवघड असल्यामुळे हा दुर्ग कायम दुर्लक्षितच राहिला. त्यामुळे इतिहासाशी अतिशय जवळचे नाते असणारा हा प्रचितगड संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोकळा श्वास घ्यायला लागला आहे. एनजीओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक भागातून सेवेकरी सहभागी होत असतात. गेल्या सात मोहिमांमधून गडाचे प्रवेशद्वार, मुख्य बुरूज, बुजले गेलेले पाण्याचे टाके, मातीत गाडल्या गेलेल्या वाड्यांचे अवशेष साफ करण्यात आले आहेत.
-----

कोट
भविष्यात गडसंवर्धनाच्या मोहिमा कायम चालू राहणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन गडसंवर्धनाच्या कार्यात सहभाग नोंदवावा.
- अल्पेश सोलकर, संगमरत्न फाउंडेशनचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात आता मुस्लिमांना आरक्षण नाही, फडणवीस सरकारने ५ टक्के आरक्षणाचा आदेश केला रद्द

T20 World Cup: नामिबियाचा पाकिस्तानला धक्का? आज साखळी फेरीतील अखेरची लढत; सुपर-८ साठी कसं आहे समीकरण?

Emmanuel Macron : फ्रान्स राष्ट्राध्यक्षांनी कोल्हापूरच्या कन्येचं केलं कौतुक, लीना नायर यांचा जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा

Supreme Court On AI : एआयचा वापर न्याय व्यवस्थेसाठी धोक्याचा, सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

'भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल खेद'; टिपू सुलतान प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली दिलगिरी

SCROLL FOR NEXT