कोकण

सोनुर्ली शाळेच्या भिंतीला भेग

CD

25165

सोनुर्ली शाळेच्या भिंतीला भेग

कोसळण्याची भीती; सीईओ खेबुडकर यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीच्या भिंतीला मोठी भेग पडली असून, ही भिंत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
​सोनुर्ली येथील ही जिल्हा परिषद शाळा अत्यंत जुनी असून, अलीकडेच या शाळेचा शतकमहोत्सव साजरा झाला आहे; मात्र सध्या शाळेच्या एका वर्गखोलीच्या भिंतीला पडलेली भेग दिवसागणिक रुंदावत चालली आहे. सुरुवातीला लहान स्वरुपात असलेली ही भेग आता मोठ्या भेगेत रुपांतरित झाल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ही भिंत खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येकडे समिती अध्यक्षा गावकर यांनी पंचायत समिती सदस्य श्री. गावकर यांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, शिष्टमंडळात वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सोनुर्ली शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सखाराम कुडतरकर, शिक्षणतज्ज्ञ नागेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य संजना राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सिमरन जाधव आदी उपस्थित होते.
----
इमारत आराखडा बनविण्याचे आदेश
​या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री. गावकर यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांची भेट घेतली. भेटीदरम्यान शाळेच्या इमारतीची सद्य:स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला असता, श्री. खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना इमारत निर्लेखित करण्याच्या सूचना दिल्या असून, नवीन इमारतीचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरच या शाळेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT