कोकण

मानोबाची यात्रा २८ ला

CD

मानोबाची यात्रा २८ ला
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे गावच्या सुप्रसिद्ध मानोबाची यात्रा २८ फेब्रुवारीला होत आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दोन दिवस आधी श्री देव मानोबाची यात्रा होते. या यात्रेसाठी तालुक्यातूनच नव्हे तर, जिल्हा आणि परजिल्ह्यातील भाविकही उपस्थित असतात. माहेरवाशिणीही या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. २८ ला दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत ही यात्रा चालणार आहे. या वेळी होणाऱ्या महाप्रसादाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळंगे ग्रामस्थ व मुंबई मंडळाने केले आहे.

शेरणी काढण्याच्या जागेची पाहणी
चिपळूण : चिपळूण शहरात लवकरच शिमगा उत्सवांना सुरुवात होणार असून, गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी देवीच्या शेरणी काढण्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाटण येथे सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाहणी केली. शेरणी काढण्याचा कार्यक्रम सुरळीत व सुरक्षित पार पडावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. श्रीदेवी करंजेश्वरी देवीचा शेरणी काढण्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून, दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात. भाटण परिसरात भरतीचे व साचलेल्या पाण्यामुळे शेरणी काढण्याच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण होत असल्याने या ठिकाणी जलसंपदा विभाग व चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली.

निबंध स्पर्धेचे उद्या बक्षीस वितरण
रत्नागिरी : झेप फाउंडेशन शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल व बक्षिस वितरण समारंभ गुरुवारी (ता. १९) ला सकाळी ११ वा. पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात आयोजित केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा छोटा गट (इ. ५वी ते ७वी) व मोठा गट (इ. ८वी, ९वी) अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : नागपूरकरांना भाजप देणार मोठे गिफ्ट!भूखंडधारक होणार काय स्वरूपी मालक

Imran Khan यांच्याशी जेलमध्ये नीट वागा! गावसकर, कपिल देवसह 'या' दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र...

उघडणार आठवणींचा पेटारा की टॉर्चर चा मारा? कसा आहे 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपट

ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्याच्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत पकडला; सरकारी वाहनात मद्यपानाचा प्रकार उघड; Video Viral

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकींचा अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT