२५२०६
पारंपरिक सण-उत्सवांना गालबोट नको
विनोद कांबळे : सावंतवाडीत शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ : आगामी काळात येणारे विविध सण आणि उत्सव नागरिकांनी आपली परंपरा जपत, शांतता राखून साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच समाज घटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.
येथील पोलिस ठाण्याच्यावतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, साहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खंदकर उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने शिवजयंती, रमजान ईद, शिमगोत्सव, होळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा या सणांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील सण-उत्सवांची मोठी परंपरा असून, ही परंपरा जोपासताना कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपस्थित सर्व मान्यवर आणि शांतता समितीच्या सदस्यांनीही सर्व सण शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करण्याची ग्वाही यावेळी दिली.
या बैठकीचे औचित्य साधून उपविभागीय श्री. कांबळे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तौकीर शेख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष साळगावकर, नगरसेवक तौकीर शेख, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, संजय लाड, कृष्णा धुळपणावर, साईराज नार्वेकर, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर, अखिल भारतीय मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर, पोलिस अमित राऊळ यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.